Set Of 3 Books Dark Horse By Nilotpal Mrinal + Ashechya Gungit Latkele Tarunya By Dnyaneshwar Jadhawar + Collector Sahiba By Kailash Manju Bishnoi
Set Of 3 Books Dark Horse By Nilotpal Mrinal + Ashechya Gungit Latkele Tarunya By Dnyaneshwar Jadhawar + Collector Sahiba By Kailash Manju Bishnoi
Couldn't load pickup availability
Set Of 3 Books
डार्क हॉर्स
पहिल्याच कादंबरीतून साहित्यजगतावर छाप पाडली.
- हिंदुस्थान
नीलोत्पल यांनी पूर्वांचलहून आलेल्या युवकांच्या जीवन संघर्षाचा प्रत्येक क्षण आपल्या झकास हिंदीत ‘डार्क हॉर्स’ मध्ये उतरवला आहे.
- दैनिक जागरण
लेखन शैलीची ही नवीन आनंददायक उडी आहे.
- आउटलूक (हिंदी)
उपहासाची भाषेवरची अशी पकड आणि कादंबरी लेखनाच्या तंत्रावर अशी हुकूमत पाहून मी आश्चर्यचकित झालो.
- पद्मश्री ज्ञान चतुर्वेदी
'आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य'
मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी म्हणून ज्ञानेश्वर जाधवर यांच्या 'आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य' या कादंबरीकडे बघता येईल. कारण प्रामाणिकपणे तरुण- तरुणींच्या जगण्याचे भावविश्व यात उलगडत जाते. मानवाने निर्माण केलेल्या अक्राळविक्राळ व्यवस्थेत तरुणांचे आयुष्य फरफटत जाते. त्यातून त्याला सावरता सावरता नाकीनऊ येतात. ज्यांना स्वतःला सावरता येत नाही, ते आत्महत्येसारखा पर्याय जवळचा करतात; पण या कादंबरीतील गोष्ट व्यवस्थेच्या कचाट्यातून सुटण्यास मदत करते
कलेक्टर साहिबा
प्रचंड खपाच्या 'कलेक्टर साहिबा' या हिंदी कादंबरीचा, मराठी अनुवाद कलेक्टर साहिबा ही कादंबरी काल्पनिक असली तरी, देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही कथा आपलीशी वाटेल. लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांची ॲमेझॉन बेस्टसेलर ठरलेली मूळ हिंदीतली ही कादंबरी ध्येय, कर्तव्य आणि भावना यात ताळमेळ साधणाऱ्या एंजल आणि गिरीशची प्रेमकथा आहे.
Share


