Set of 2 Mahasamrat Zanzavat Khand 1& 2+ Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj | By Vishwas Patil+Krushnarav Arjun Keluskar
Set of 2 Mahasamrat Zanzavat Khand 1& 2+ Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj | By Vishwas Patil+Krushnarav Arjun Keluskar
Couldn't load pickup availability
धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे.
पावनखिंडीतला थरार, सुरतेची महालूट, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीत केलेले निशस्त्रीकरण, शाहिस्तेखानाला वेसण, कुडाळचे महायुद्ध आणि सागराच्या पोटातले सिंधुदुर्ग निर्मितीचे अचाट स्वप्न! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’!
छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे.
Share
