Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 400.00Rs. 340.00
Availability: 450 left in stock

रतन टाटा
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला.
रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटा यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.

रतनांकित पर्व
भारतीय समाजमनाला आणि उद्योग जगताला मोहून टाकणारं रतन टाटा यांनी आयुष्यात माणसं आणि संस्था जोडल्या, त्या त्यांच्या नैतिकतेवर आधारित व्यावसायिक नीतीमुळेच! व्यवसाय कौशल्य, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अचूकतेचा आग्रह आणि मुख्य म्हणजे व्यवसायवृद्धीचा ध्यास, या सगळ्या गोष्टींमुळे हाती घेतलेल्या कामाचं सोनं करणं, तेही कुठलेही गैरव्यवहार न करता त्यांना सहज जमतं. त्यातून ते एक 'परफेक्शनिस्ट' हे विशेषण सहजपणे लावता येईल, असे व्यावसायिक बनले. एक बलाढ्य उद्योगपती म्हणून वारूपाला आले. जे काम करायचं ते निर्दोष, उत्कृष्ट आणि परिपूर्ण असायलाच हवं या बाबतीत ते विशेष आग्रही राहिले. आणि त्यातूनच ते घडले देशाला ज्यांचा अभिमान वाटावा, असे उद्योजक! ते फक्त व्यावसायिक वर्तुळातच नव्हे, तर या वर्तुळाबाहेरच्या लोकांसाठीही ठरले एक आदर्श, दानशूर, अनुकरणीय आणि पारदर्शक अशी व्यक्ती!


Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Set Of 2 Books Ratan Tata + Ratnankit Parv By Sudhir Sevekar,Sandhya Ranade
- +

Recently Viewed

Recently Viewed Books