Savitribai Jotibanche Shikshak Michel Dampatya Aani Streeshikshanatil Poorvasuri By Kamil Parakhe (सावित्रीबाई जोतिबांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्रीशिक्षणातील पूर्वसुरी)
Savitribai Jotibanche Shikshak Michel Dampatya Aani Streeshikshanatil Poorvasuri By Kamil Parakhe (सावित्रीबाई जोतिबांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्रीशिक्षणातील पूर्वसुरी)
Couldn't load pickup availability
सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शिक्षणक्षेत्रातील आणि इतर कार्यामागे आतापर्यंत इतिहासाच्या पडद्याआड राहिलेल्या अनेक व्यक्तींचा हातभार लागला होता. गफार बेग मुन्शी आणि लिजिट साहेब ही त्यापैकी सुरुवातीची दोन नावे. कुठल्याही महान व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या काळात असलेली परिस्थिती, त्या काळातल्या घटना आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींचाही अभ्यास करावा लागतो. फुले दाम्पत्याच्या समकालीन व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास केला की त्या कालखंडातील परिस्थितीचे खरेखुरे आकलन होते. जोतिबांचे शिक्षक जेम्स मिचेल, सावित्रीबाईंना अध्यापनाचे प्रशिक्षण देणार्या सिंथिया फरार आणि मिसेस मिचेल, तसेच जॉन स्टिव्हन्सन, डॉ. जॉन विल्सन, मार्गारेट विल्सन आणि जॉन मरे मिचेल यांची नावे सावित्रीबाई आणि जोतिबांच्या विविध चरित्रांत विविध संदर्भांत येतात. मात्र, या व्यक्तींबाबत माहिती देणारे आणि त्याद्वारे फुले दाम्पत्याच्या जीवनावर नवा प्रकाश टाकणारे लिखाण आतापर्यंत झालेले नाही. कामिल पारखे यांच्या या पुस्तकामुळे ही कसर भरुन निघेल.
Share
