Savarkar By Ashok Kumar Pandey (सावरकर – अशोककुमार पांडे)
Savarkar By Ashok Kumar Pandey (सावरकर – अशोककुमार पांडे)
Couldn't load pickup availability
हे पुस्तक म्हणजे एका सावरकरांपासून दुसऱ्या सावरकरांपर्यंत झालेल्या प्रवासाचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. यात सावरकरांच्या प्रचलित प्रतिमांचा विचार करून त्यांच्या क्रांतिकारकापासून राजनेत्यापर्यंतच्या आणि नंतर हिंदुत्वाच्या राजकारणाचा वैचारिक प्रतिनिधी आणि पुरोहित होण्यापर्यंतच्या विकासाचा खराखुरा क्रम समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी लेखकानं सावरकरांनी लिहिलेल्या विपुल लेखनाचा अभ्यास केला आहेच, शिवाय त्यांच्याविषयीच्या बहुतेक सगळ्या पुस्तकांचं, तत्कालीन ऐतिहासिक स्रोतांचं, समकालीनांकडून, ब्रिटिश सरकारकडून सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांचं गाढं अध्ययन केलं आहे. हे सावरकरांचं चरित्र नाही, तर त्यांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य आंदोलनाच्या एका मोठ्या पटाला समजून घेण्याचा, वाचण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. राष्ट्राच्या संकल्पनेच्या आडून वेगवेगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक विकृती समोर येतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सध्याच्या प्रचार-प्रसाराच्या काळात अशा प्रकारच्या निष्पक्ष अध्ययनाची अत्यंत गरज आहे. अशोककुमार पांडेय यांनी सध्याच्या इतिहासविषयक संदिग्धतांविषयीच्या पार्श्वभूमीवर काश्मीर आणि गांधी यांच्याविषयीच्या पुस्तकांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. हे पुस्तक त्यातील पुढचा टप्पा आहे आणि अशा प्रकारे वर्तमानकाळात करण्यात आलेला एक आवश्यक हस्तक्षेपही आहे.