Satyashodhak Anna Bhau Sathe: Sahitya shodh ani samiksha By Dr. Sushilprakash Chimore (सत्यशोधक आण्णा भाऊ साठे : साहित्य शोध आणि समीक्षा)
Satyashodhak Anna Bhau Sathe: Sahitya shodh ani samiksha By Dr. Sushilprakash Chimore (सत्यशोधक आण्णा भाऊ साठे : साहित्य शोध आणि समीक्षा)
Couldn't load pickup availability
सत्यशोधक आण्णा भाऊ साठे : साहित्य शोध आणि समीक्षा
'सत्यशोधक आण्णा भाऊ साठे : साहित्य शोध आणि समीक्षा' हा डॉ. सुशील प्रकाश चिमोरे यांचा चिंतनशील, चिकित्सक, ओघवता ग्रंथ सर्वांगातेने सिद्ध असाच आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या लोकाभिमुख साहित्यावर सूक्ष्म उकल सापडणं तसं विरळच ! याला सदर ग्रंथ अपवाद आहे. अण्णा भाऊ साठे यांच्यावर तात्विक विचारांचा प्रभाव पहिल्यांदाच प्रस्तुत ग्रंथात आढळतो. लेखकाचे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि विचारांचा नव्याने घेतलेला वेध अभिनंदनीय आहे. परिवर्तनादी कथेतील नैतिकता मांडून नैतिकता वेशीला टांगणाऱ्या समाजाला परिवर्तनशील बनवण्यासाठीचा लेखकाचा प्रयत्न गौरव प्राप्त आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याकडे डोळसपणे बघायला हा ग्रंथ नक्कीच महत्वाचा ठरेल असा विश्वास वाटतो. अण्णा भाऊ साठे यांच्या एकूणच साहित्य प्रवाहाची, समाज वास्तवाची विलोभनीय नोंद लेखकांनी या ग्रंथात घेतली आहे.
Share
