Satyakatha By Madhukar Dharmapurikar, Sneha Avsarikar ( सत्यकथा )
Satyakatha By Madhukar Dharmapurikar, Sneha Avsarikar ( सत्यकथा )
Couldn't load pickup availability
पुस्तक - 'सत्त्वकथा'
पाने - 235
यंदाचे वर्ष हे मराठीतील मर्मग्राही संपादक श्री .पु. भागवत यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. १९३३ ते १९८२ असे जवळपास अर्धशतक प्रसिद्ध होणाऱ्या 'सत्यकथा' या मासिकाचे ते संपादक होते. त्यातील कथांचा दर्जा आणि नव्याने पुढे आलेले प्रयोगशील लेखक यांमुळे मराठी साहित्याच्या विकासप्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा म्हणून सत्यकथेकडे पाहिले जाते.
अशा सत्यकथेत १९६१-१९७० या काळात प्रसिद्ध झालेल्या निवडक उत्कृष्ट २७ लघुकथांचा संग्रह 'सत्त्वकथा' या नावाने 'देशमुख आणि कंपनी'कडून प्रकाशित होतो आहे.
मधुकर धर्मापुरीकर आणि स्नेहा अवसरीकर यांनी संग्रहाचे संपादन केले आहे. या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रसिध्दी, समीक्षा आणि चर्चेच्या गजबजाटापासून दूर राहिलेल्या परंतु कसदार अशाच कथांची निवड संपादकद्वयीने केली आहे. अनवट लेखकांच्या, पन्नास वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या या कथा त्यातल्या ताजेपणामुळे आजही अतिशय वाचनीय आहेत
Share
