Satva Rutu By Rohini Ninawe (सातवा ऋतू)
Satva Rutu By Rohini Ninawe (सातवा ऋतू)
Couldn't load pickup availability
रोहिणी निनावे. सुप्रसिद्ध लेखक आणि कवी श्री वसंत निनावे यांच्या कन्या. कॉलेज जीवनापासूनच त्यांना लिखाणाची आवड निर्माण झाली. मराठी आणि हिंदी साहित्यात एम. ए . केल्यामुळे गद्य आणि पद्य या दोन्ही विधांमध्ये अभिरुची निर्माण झाली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि दिवाळी अंकांपासून त्यांच्या कविता लेखनाला सुरुवात झाली. नंतर अनेक मालिकांची शीर्षक गीत त्यांनी लिहिली . संस्कार ,घरकुल, कुंकू ,अवघाची संसार ,मृण्मयी, अर्थ, पुढचं पाऊल ,स्वप्नांच्या पलीकडले, ठिपक्यांची रांगोळी ,फुलाला सुगंध मातीचा, मुरंबा ,लग्नाची बेडी ,तुझेच मी गीत गाता आहे, अजूनही बरसात आहे इत्यादी....... त्यांनी लिहिलेल्या अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांना पुरस्कार मिळाले आहेत . याआधी त्यांचं 'इंतजार' नावाचा हिंदी कवितांचं पुस्तक प्रकाशित झालं असून, त्याला ज्येष्ठ कवी गुलजार यांची प्रस्तावना लाभली आहे . रोहिणी निनावे यांनी अनेक मालिकांचे लेखन केलं आहे . दामिनी ,अवंतिका ,अवघाची संसार, ऊन पाऊस ,कळत नकळत ,पुढचं पाऊल ,मन उधान वाऱ्याचे ,स्वाभिमान ,माझी तुझी रेशीमगाठ , माझ्या नवऱ्याची बायको ,अग बाई सासुबाई ,अजूनही बरसात आहे ,मुलगी झाली हो या मराठी मालिका; तसंच कुसुम, संजीवनी, प्यार का दर्द है ,यहा मे घर घर खेली इत्यादी हिंदी मालिकांचे लेखनही केल आहे . स्मिता तळवळकर अभिनित 'क्षण एक पुरे' हे नाटक देखील त्यांनी लिहिलं आहे . तसेच तुझ्यासाठी,जुईली आणि हृदयांतर या चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलं आहे . अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केलं आहे . 'चंदना' आहे त्यांचा पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. गेली 27 वर्ष त्या सातत्यानं गीतलेखन,कवितालेखन आणि मालिकालेखन करत आहेत.
Share
