Sathvanitil Gani Gazalgandharva Madan Mohan (साठवणीतील गाणी गजलगंधर्व मदन मोहन)
Sathvanitil Gani Gazalgandharva Madan Mohan (साठवणीतील गाणी गजलगंधर्व मदन मोहन)
Couldn't load pickup availability
पौर्णिमेच्या रात्रीचं निरभ्र आकाश... ग्रह-तारे-नक्षत्रांचा सडा घातलाय वरती अन् हिरवागार गालिचा पसरलाय धरतीवरती ! असाच अपलक आभास नि आनंद होत राहतो, मदन मोहनची गीतसंपदा अनुभवताना ! मदन मोहन यांची गाणी दुःखी असतात? कोण म्हणतं? धैर्य लागतं दर्द आणि मदन मोहन समजायला. दुबळ्या माणसाचं काम नाही ते... इतक्या साऱ्या संगीतकारांच्या मेळ्यात, गज़लने प्रेमात पडण्यासाठी निवड केली ती मदन मोहनचीच, हा एक शुभयोगच... मदन मोहन अन् लताच्या गज़ल म्हणजे प्राजक्ताचे टप्पोरे अश्रूच ! मदन मोहनबरोबर फार चित्रपट करू शकलो नाही, याबद्दल गुलजार यांनी खेद प्रकट केला. अहो, आम्ही रसिक तर रोज हळहळत असतो ! मदन मोहन गेले पन्नाशीतच. पण गाणी टिकून राहिली. सच्ची कला काळाच्या भक्ष्यस्थानी कधीच पडत नाही... मदन मोहनच्या अमर संगीताचा, रसिक लेखक अंबरीश मिश्र यांनी घेतलेला ललितसुंदर शोध...
Share
