Sathittari Marathi Granth Vyavhar By Dr. Pradip Karnik (साठोत्तरी मराठी ग्रंथव्यवहार)
Sathittari Marathi Granth Vyavhar By Dr. Pradip Karnik (साठोत्तरी मराठी ग्रंथव्यवहार)
Couldn't load pickup availability
नावलौकिकप्राप्त लेखक, संपादक, संशोधक आणि मराठी संशोधन मंडळाचे भूतपूर्व संचालक डॉ. प्रदीप कर्णिक यांचे ‘साठोत्तरी मराठी ग्रंथव्यवहार’ हे पुस्तक त्यांच्या ग्रंथविषयक विचारांचे बोलके शब्दरूप आहे. आपल्याकडील ग्रंथव्यवहारात आढळणाऱ्या अनुकूल-प्रतिकूल गोष्टी, उणिवा आणि उपाय या सर्वांचा त्यांनी घेतलेला परामर्श थक्क करणारा आहे. सुरवातीच्या आपल्या सत्तर पानांच्या विस्तृत लेखामध्ये, त्यांनी साहित्यजगतातील आपल्या मुशाफिरीचा संदर्भांनी ओतप्रोत आढावा घेतला आहे. त्यातून, साठोत्तरी ग्रंथव्यवहाराबाबतचा त्यांचा अभ्यासपूर्ण आणि अभ्यसनीय विचार प्रत्ययास येतो. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यावरील सटीक विवेचने सलगपणे उलगडत असल्याने, वाचकाला पुढे जाताना पुन्हा मागे यावे लागत नाही हा या पुस्तकाचा गुणविशेष आहे.
केवळ मराठी ग्रंथव्यवहारातील संबंधितांनाच नव्हे तर, मराठी भाषेचा अभ्यास करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी, डॉ. प्रदीप कर्णिक यांनी आपल्या अथक अभ्यासातून सिद्ध केलेला हा ग्रंथ भाषासंशोधनाच्या हमरस्त्यावरील दिशादर्शक आहे.
Share
