Sat Niyam By Hansaji J. Yogendra, Prajakta Chitre(Translators) (सात नियम -डॉ. हंसाजी योगेंद्र)
Sat Niyam By Hansaji J. Yogendra, Prajakta Chitre(Translators) (सात नियम -डॉ. हंसाजी योगेंद्र)
Couldn't load pickup availability
आयुष्यावर आपले नियंत्रण नाही असे तुम्हाला वाटत आहे का? तुमचे आरोग्य, मनोवस्था आणि तुम्हाला गाठायचे असलेले लक्ष्य… यांतली कुठलीच गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाहीये, असे वाटतेय का? एक अदृश्य शक्ती तुमच्या नात्यावर हुकुमत गाजवत आहे, असे काही होतेय का? आयुष्यात तुम्ही आखणी केली होती, त्या पद्धतीने गोष्टी घडाव्यात म्हणून जरा थांबून नव्याने आयुष्य सुरू करण्याची तीव्र इच्छा तुम्हाला होतेय का ? तसे असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे सात नियम हे पुस्तक सोप्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करणारे पुस्तक असून, ते वाचून तुम्ही तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकता. ‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या संचालिका डॉ. हंसाजी योगेंद्र या पुस्तकाच्या लेखिका आहेत. डॉ. हंसाजी योगाच्या क्षेत्रातील अतिशय मान्यवर व्यक्ती आहेत. आयुष्याच्या सर्व घटकांमध्ये समतोल निर्माण करून तो कसा राखायचा, हे प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे ऊहापोह करून त्यांनी सांगितले आहे. डॉ. हंसाजी आयुष्याच्या पुनर्रचनेचा विषय समजावून सांगताना काही घटना, त्यातील व्यक्ती, त्यांच्या समस्या, त्याचे झालेले निराकरण हे सगळे अतिशय रंजकपणे मांडतात. त्यामुळे तुम्ही कसे बदल करायला पाहिजेत, त्याची प्रक्रिया कशी असावी हे सगळे समजणे आणि पचवणे सोपे जाते. मग ती रात्रीची शांत झोप असो किंवा पौष्टिक आहाराच्या सवयी, कामाच्या ठिकाणी असलेला ताण असो… या सगळ्या गोष्टींबद्दल एक नवीन दृष्टिकोन तयार व्हायला मदत होते. त्यामुळे आता वेळ न घालवता पुनर्रचना करण्याचे बटण दाबा आणि नव्याने सुरुवात करा.
Share
