Sare Pravasi Ghadiche By Jaywant Dalvi ( सारे प्रवासी घडीचे )
Sare Pravasi Ghadiche By Jaywant Dalvi ( सारे प्रवासी घडीचे )
Couldn't load pickup availability
‘‘पावसाच्या पुराबरोबर येणार्या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याची देखील मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही. त्यामुळे सर्रास दुष्काळी दारिद्य्र.’’अशा दक्षिण कोकणातला एक गाव जयवंत दळवींनी या पुस्तकात चितारायला घेतला आहे. आणि एक मोठा कलात्मक चमत्कार म्हणजे या नापीक प्रदेशातून खळाळत्या प्रसन्न हास्याचे सोळा आणे पीक काढले आहे!
तर्हेवाईक माणसांच्या व्यक्तिचित्रांचा एक प्रदीर्घ पटच ‘सारे प्रवासी घडीचे’ मध्ये दळवींनी उलगडीत नेला आहे. वेताळासारखा उग्र पावटे मास्तर, आणि स्थितप्रज्ञ दारू-दुकानदार अंतोन पेस्तांव, गांधीवादी डॉ. रामदास आणि लोकलबोर्डात निवडून आलेला ‘बिचारा’ केशा चांभार, परस्परांशी तहाहयात स्पर्धा मांडणारे आबा आणि बाबुली, दशावतारवाला जिवा शिंगी आणि ढब्बू पैसा खणकन वाजवून घेणारा दुकानदार नायक... एक की दोन - किती नावे सांगावी? शिवाय ही माणसे सुटेपणाने येत नाहीत
Share
