Skip to product information
1 of 1

Sanskrutiche Antarang By Dr P S Jagatap

Sanskrutiche Antarang By Dr P S Jagatap

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 153.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

आपणा सर्वांच्या मनात नेहमी असा एक प्रश्न उद्भवतो की, ‘संस्कृती म्हणजे काय?' या प्रश्नाचे विविध अंगांनी विश्लेषणात्मक पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला असून या संदर्भात मान्यवर विद्वानांनी संस्कृतीविषयक केलेल्या व्याख्यांचे विवेचन केलेले आहे. त्यावरून ‘संस्कृती' या विषयाची सुस्पष्ट संकल्पना काय आहे, हे समजते. “संस्कृतीचे विविध” प्रकार या प्रकरणात समाजामध्ये रूढ असलेल्या निरनिराळ्या संस्कृतींबद्दल संक्षिप्त आढावा घेतला आहे. संस्कृतीच्या संदर्भातील चिंतन करताना तिच्या गुणवैशिष्ट्यातून ती जनसामान्यांत कशी रुजली आहे. याचा प्रत्यय आणून दिला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये साजरे केले जाणारे सण, उत्सव व अंगीकारलेली व्रते ही संस्कृतीला गती प्राप्त करून देणारी चैतन्यप्रतीके आहेत. त्याद्वारे संस्कृतीचे जतन कसे केले जाते, हे स्पष्ट केले आहे. लोकनृत्य, लोकगीत, भक्तिगीत, भावगीत, पोवाडा, लावणी, कविता, अभंग, नाटक-सिनेमा, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू व शिल्पकला ही संस्कृतीची साधने असून त्यातून प्रकट होणाऱ्या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे संस्कृतीच्या अंतरंगाचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो, तेथील भौगोलिक व नैसर्गिक परिस्थितीचा संस्कृतीवर कसा प्रभाव जाणवतो; हे उदाहरणासहित निदर्शनास आणले आहे. तसेच विविध प्रकारची फळे व वनस्पतींचा सांस्कृतिक जीवनावर असलेला प्रभाव आणि त्यांची उपयुक्तता याविषयी सविस्तर विवेचन केले आहे. संस्कृतीने आपल्याला काय योगदान दिले याचा अनुभूतीपूर्ण गोशवारा शेवटी दिला आहे. यातून संस्कृतीचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याची साक्ष पटते. संस्कृतीच्या विविध अंतरंगांनी युक्त असलेले हे पुस्तक निश्चितपणे वाचकांच्या पसंतीस उतरेल, याची खात्री आहे

View full details