Sansar By Saksam Garg, Dr. Ambareesh Khare(Translators) संसार
Sansar By Saksam Garg, Dr. Ambareesh Khare(Translators) संसार
जर तुमच्यासमोर देव प्रगट झाले, तर तुम्ही काय कराल? एक असे ठिकाण आहे, जिथे मोबाईल फोन बंद पडतो, स्मार्टवॉच चालत नाही, आणि हातावर निळ्या रंगाचे निशाण उत्पन्न होते. आधुनिक युगातील भारतात राहणाऱ्या अमन चंद्र आणि संसारातील इतर दहा जीवांचे अपहरण करून जेव्हा त्यांना हिमालयातील गुप्त खोऱ्यात नेले जाते, तेव्हा त्यांच्या बाबतीत असेच घडते. हिंदू देवता, योगी आणि पौराणिक पशू यांचा निवास असलेल्या या दिव्य क्षेत्रामध्ये जाऊन संसारातील या जीवांनी काय करायचे, हे स्पष्टपणे ठरलेले असते. त्यांना योगाच्या साहाय्याने काही प्राचीन विद्या शिकाव्या लागतात. त्यानंतर एका जीवावरच्या यात्रेत सहभागी होऊन नेमून दिलेले काम पूर्ण करावे लागते. या भयंकर प्रवासातून म्हणे थोडीच माणसे वाचून परत येतात. पण मग त्यांनी असल्या प्रवासाला जायचेच का? आणि या सगळ्याशी देवांचा काय संबंध? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात, तोच संसारातील जीवांना कळू लागते की तिथे प्रत्यक्षात कोणतीतरी मोठी योजना आकार घेत आहे. देवांच्या राजाने एक विचित्र आज्ञा दिली आहे. आता अमनला निर्णय घेणे अधिकच कठीण जाणार आहे. त्याच्या निर्णयामुळे केवळ त्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भवितव्य पालटणार आहे... “शेवटी हे भारताने हॅरी पॉटरला दिलेले उत्तर आहे.”— कृष्ण उदयशंकर, लेखक “संसाराचे कथानक आ वासायला लावणारे उत्तम मिश्रण आहे, एक अद्भुत प्रतिभा उदयाला आली आहे!” —अनुजा चंद्रमौली, लेखिका