Sangharshyoddha: Ladha Aarakshanacha By Satish Kale (संघर्षयोद्धा : लढा आरक्षणाचा)
Sangharshyoddha: Ladha Aarakshanacha By Satish Kale (संघर्षयोद्धा : लढा आरक्षणाचा)
Couldn't load pickup availability
आमचं आयुष्य म्हणजे पावसावर, नशिबावर आणि बाजारभावावर अवलंबून. पण आता पाऊस फसवतोय, नशीब ठाकली, आणि बाजार तर इतका बेरकी झालाय कि मेहेनत करूनही पॉट भरायला धडपड करावी लागते. माझा भाऊ बी.एस्सी. पर्यंत शिकला... मोठं स्वप्न बघून. पण त्याच काय झालं ? हातात नोकरी नाही. शिकवायला घेतलेलं कर्ज फेडायला आज आमची जमीन विकायची वेळ आलीये. शेतकरी आत्महत्या करत आहेत. आधी वाटायचं की मेहेनतीच बळ पुरेसं असत. पण आता कळतयं, फक्त मेहेनत पुरेशी कधीच नसते. जेव्हा इतरांना शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी मिळतात आणि आमची मूलं मागेच राहतात, तेव्हा काळजात जाळ उठतो. आमचंही स्वप्न आहे की, आमच्याही पोरांनी शिकावं, प्रगत शेती करावी, शेतीव्यतिरिक्तसुद्धा काहीतरी करावं, नोकरीही करावी, घर उभं करावं, सुखी संसार करावा. कारण आमचं जगणं, आमचं अस्तित्व, हे सगळंच आता आरक्षणावर टिकून आहे. नाहीतर आरक्षानाशिवाय आमच्यासारख्या शेतकऱ्यांची मुलं मागेच राहणार. आज रोजच्या जेवणावेळी घासागणिक आरक्षणाची गरज भासतेय, काय माहित हा घास परत नशिबात असणार आहे की नाहीं. म्हणून आरक्षण हेच आमचं हत्यार झालंय
-- अक्षय मुळीक, शेतकरी
Share
