Sangharshayatri Dr. Balasaheb Dagdu Bande Bhag 1 By Babasaheb Bande (संघर्षयात्री डॉ. बाळासाहेब दगडू बांडे भाग १)
Sangharshayatri Dr. Balasaheb Dagdu Bande Bhag 1 By Babasaheb Bande (संघर्षयात्री डॉ. बाळासाहेब दगडू बांडे भाग १)
Couldn't load pickup availability
प्रत्येक माणूस संघर्ष करतो पण बऱ्याचदा सामान्य लोकांचा संघर्ष हा फक्त भाकरीचा संघर्ष असतो. तर असामान्य लोकांचा संघर्ष हा समाज उत्थानाचा असतो. दारिद्र्याच्या छाताडावर लाथ मारून आकाशात झेपावू पाहणाऱ्या डॉक्टरांचा संघर्ष हा भाकरीचा तर होताच पण त्याचबरोबर असामान्य स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि आपल्या सोबत असलेल्या अनेकांच्या चांगल्या आयुष्यासाठी सामाजिक हिताच्या भावनेतून मानवतावादी राहिल्याने डॉक्टरांच्या संघर्षाचे वेगळेपण कायम राहिले आहे. आज आम्ही आजूबाजूला पाहतो. तेव्हा छोट्या छोट्या अपयशांनी नैराश्य आलेली, खचलेली आणि मनातून हरलेली अशी घाबरलेली पिढी दिसायला लागते. आज मुलांच्या पायात सगळ्या सुख सुविधा असल्याने कसलाही संघर्ष मुलांना करावा लागत नाही. तरी देखील सामाजिक स्तरावर या पिढीतील अपयशी मुलं पाहिली की अशा मुलांसाठी प्रेरणादायी अस काहीतरी असावं आणि ते डॉक्टरांसारख्यांच्या कार्यातून एक इतिहास बनून यावं याच विचारापोटी खरतर हे पुस्तक अस्तित्वात आले आहे.
आज मरण स्वस्त झाले असताना जगण्याची आशा देणारी संघर्षवादी अशा माणसांच्या प्रेरणेची गरज निर्माण झाली आहे. भयानक संघर्ष असताना देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम डॉक्टर म्हणून उभी राहिलेली डॉक्टर बांडे यांची चरित्र कहानी अनेकांचा प्रेरणास्रोत व्हावी म्हणून हे पुस्तक जगासमोर यावे यासाठीच हा अट्टाहास....
दारिद्र्याच्या दारात भुकेचा अतीव संघर्ष होत होता. जगण्याच्या दिशाच माहिती नव्हत्या. करंज्या विकून, मोलमजुरी करून शिक्षणाची स्वप्न पाहणारा तेजस्वी चिमुरडा सर्वांचा लाडका बाळ... ते जगण्याच्या भीषण परिस्थितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने तोंड देत गरिबीच्या छाताडावर पाय देऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या आणि त्याच क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉक्टर म्हणून ख्याती मिळवलेल्या एका ध्येयवेड्या डॉक्टरांची संघर्षगाथा...म्हणजेच ....
संघर्षयात्री डॉ. बाळासाहेब दगडू बांडे भाग १ हे चरित्र...आज कित्येकांच्या प्रेरणेचा मुख्य स्रोत बनले आहे. तेव्हा लगेच आपली प्रत मागवा..
Share
