Skip to product information
1 of 2

Samruddha Palakatva By Dr. Aditi Kalmekha (समृद्ध पालकत्व)

Samruddha Palakatva By Dr. Aditi Kalmekha (समृद्ध पालकत्व)

Regular price Rs. 230.00
Regular price Rs. 270.00 Sale price Rs. 230.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

या देशात छोटी गाडी चालवताना लायसन लागते. पण पालक होण्यासाठी त्यासाठीचे कौशल्य, समज काहीच सिद्ध करण्याची गरज नसते. पालक होणे हे किती मोठे आव्हान आहे आणि पालकत्वाचे किती विविधांगी पैलू आहेत ? हे सांगणारे हे महत्वाचे पुस्तक.

बाळाच्या वाढीच्या शास्त्रीय महितीपासून मेंदूची वाढ, विविध बुद्धिमत्ता ही सारी शारीरिक मानसिक माहिती देत त्या टप्प्यावर पालकांनी काय करायला हवे ? याचे हे पुस्तक प्रत्येक पालकासाठी जणू गाईडच आहे.

लेखिकेचे वैशिष्ट्य हे की केवळ तात्विक भाषेत न सांगता विविध परिस्थितीत पालकांनी कसे बोलले, वागले पाहिजे हे उदाहरणासह सांगितल्याने पालकांना नक्की दिशा मिळेल.

लोकशाही पालकत्व ही संकल्पना मांडत मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करत त्यांचा आत्मसन्मान न दुखावता त्यांच्याशी संवादाचे कौशल्य कसे विकसित करावे ? हा या पुस्तकातील सर्वात मोलाचा आणि दिशादर्शक भाग सर्वच पालकांसाठी महत्वाचा आहे.

पालकत्व या विषयावर खूप बोलले जात असेल तरीही मुलांची वाढ, मानसशास्त्र हा अभ्यास सुलभपणे मांडत त्या स्थितीत कसे बोलावे व कसे हाताळावे हे सोदाहरण मार्गदर्शन झाल्याने हे पुस्तक पालकांसाठी अधिक उपयुक्त आहे.

स्वतः एक डॉक्टर, पालक आणि अनेक पालक- मुलांशी संवाद होत असल्याने डॉ. अदिती यांचे लेखन पुस्तकी न होता अनुभवातून अधिक प्रवाही, सहज व संवादी झाले आहे. त्यामुळे ते समाजाच्या सर्व स्तरातील पालकांसाठी लाभदायक आहे !

View full details