Samrat Chandragupta Mourya By Milind Jadhav (सम्राट चंद्रगुप्त मौर्य)
Samrat Chandragupta Mourya By Milind Jadhav (सम्राट चंद्रगुप्त मौर्य)
Couldn't load pickup availability
या चरित्रात्मक कादंबरीत चंद्रगुप्ताचा थरारक जीवनपट, जगज्जेत्या अलेक्झांडरशी भेट, चाणक्याच्या साथीने नंद घराण्याचे उन्मूलन, मौर्य सम्राज्याची स्थापना, न भूतो न भविष्यती असा साम्राज्यविस्तार आणि आयुष्यभर तळहातावर शीर घेत मृत्यूशी दोन हात करून मिळावलेलं सिंहासन, राजपाट, धनद्रव्य असं सारं काही एका क्षणात सोडून, निष्कांचन होत जैन मुनी भद्रबाहूंच्या संगतीत झालेली जीवनाची संध्याकाळ... अशा चंद्रगुप्ताच्या जीवनप्रवासात नियतीने पेरून ठेवलेल्या एका पेक्षा एक नाट्यमय प्रसंगांची अनुभूती होते.
‘‘... जोवर जीवनाची धुंदी चढलेली असते, रक्तात भिनलेली असते तोवरच ते हवंहवंस वाटतं. तोवरच त्यावर मोह टिकतो. ती धुंदी उतरली की सारंकाही व्यर्थ वाटू लागतं आणि मग सुरू होते धडपड-जीवनाची सार्थकता शोधण्याची. पण लक्षात येतं की, आयुष्य तर सरलं आहे. हातात फारच थोडे दिवस आहेत. भात्यात आता एकच बाण शिल्लक आहे आणि अचूक भेद अजून काही साधता आलेला नाहीये. प्रत्येकाला जीवनात हा क्षण येतो. कुणाच्या आयुष्यात लवकर तर कुणाच्या उशिरा. तो ओळखायचा असतो. हातून निसटण्यापूर्वी. अन्यथा शेवटचा बाणही व्यर्थ जाण्याची शक्यता गडद होते. हा शेवटचा बाण असतो समाधानाचा. अचूक वेध साधला गेला तर ते मिळतं आणि हे समाधान फार फार आवश्यक असतं मरताना...! त्याशिवाय आपण दुसरं काहीही सोबत नेऊ शकत नाही. मृतदेहाच्या चेहर्यावरही आपला ठसा उमटवून जातं हे समाधान.’’
एका संन्यस्त योद्धाचा गूढ, थरारक, रोमांचित करणारा जीवनप्रवास उलगडणारी वेगळ्या धाटणीची ही उत्कंठावर्धक चरित्रात्मक कादंबरी.
Share
