Sampurna Garbhasanskar : संपूर्ण गर्भसंस्कार By Shalaka Hampras
Sampurna Garbhasanskar : संपूर्ण गर्भसंस्कार By Shalaka Hampras
गर्भसंस्कार हा आमच्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे. ह्या पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय व आध्यात्मिक ज्ञानाला नवीन विज्ञान व संशोधनाची जोड मिळाल्याने गर्भसंस्कारशास्त्र अजूनच परिपूर्ण व उपयुक्त झाले आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपले मूल बुद्धिमान, सुंदसर, सद्गुणी व्हावे. आपल्या धर्मग्रंथांनी, महापुरुषांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, मुलावर गर्भात असतानाच संस्कार केल्यास ते जास्त प्रभावी ठरतात. सुभद्रा, कौशल्या, माँ जिजाऊ, त्रिशला, राणी मदलसा, मदर मेरी, भुवनेश्वरी देवी यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे सहज पटू शकते. गर्भसंस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलाला आयुष्यभर साथस देईल अशी शिदोरी आपण देत असतो. कारण गर्भारपणात बाळाची प्रत्येक नवीन पेशी तयार होतानाच आई-वडिलांच्या जीन्समधून जे घटक बाळामध्ये संक्रमित होतात, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. गर्भसंस्काराच्या ज्ञानाचा वापर करून गर्भारपणातील नऊ महिने जर आहार, विहार, संस्कार व या पुस्तकात दिलेल्या इतर बाबींचे आचरण केल्यास होणारी संतती नक्कीच तेजस्वी व बुद्धिमान होईल. त्यामुळे मुलांच्या उत्तम जडण-घडणीचा प्रवास सुखकर होण्यास ही पायाभरणीच ठरेल. देशाची भावी पिढी घडविण्यात खारीचा वाटा उचलणारे आणखी एक पुस्तक आपल्या हाती देतानार मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे.