Sampurn Buddhimapan (संपूर्ण बुद्धिमापन)
Sampurn Buddhimapan (संपूर्ण बुद्धिमापन)
Couldn't load pickup availability
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रकाशनाने आतापर्यंत प्रकाशित केलेल्या सर्वच पुस्तकांना विद्यार्थिमित्रांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थिमित्रांचा हा प्रतिसाद व प्रकाशनावर त्यांनी दाखविलेला अतोनात विश्वास यांमधून मिळालेल्या प्रेरणेतूनच ‘संपूर्ण बुद्धिमापन’ या पुस्तकाची ही संपूर्ण सुधारित व विस्तारित पस्तिसावी आवृत्ती आपल्या हाती देणे शक्य झाले आहे.
हे पुस्तक लिहिताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब व गट क आणि तत्सम परीक्षांमधील तद्वतच सर्व प्रकारच्या सरळसेवांमधील ‘बुद्धिमापन चाचणी’ हा उपविषय व राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या ‘सामान्य क्षमता चाचणी’ या विषयातील ‘बुद्धिमापन चाचणी’ हा घटकविषय या सर्वांच्या स्वरूपाचा, त्यांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा व त्यातून प्रतीत होणाऱ्या अभ्यासक्रमाचा प्रामुख्याने विचार केला असला, तरी महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हा विषय संपूर्णपणे आकलन व्हावा व अन्य स्पर्धा परीक्षांमधील इंग्रजी भाषेतील पेपरही त्यांना उत्कृष्टरीत्या सोडविता यावेत, अशा रीतीने या पुस्तकाची रचना केली आहे. पुस्तकाची रचना करताना राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा व अन्य शिष्यवृत्त्यांसाठी होणाऱ्या परीक्षा यांनाही ते उपयुक्त ठरावे, हा दृष्टिकोन ठेवला आहे.
पुस्तकात शक्य तितकी, साधी, सोपी, रोजच्या व्यवहारातील भाषा वापरली असून स्पष्टीकरणांवर व पर्यायाने विषयाच्या आकलनावर अधिक भर दिला आहे.
Share
