Samiksha Ani Samikshak By Sudhir Rasal (समीक्षा आणि समीक्षक)
Samiksha Ani Samikshak By Sudhir Rasal (समीक्षा आणि समीक्षक)
Couldn't load pickup availability
‘समीक्षा आणि समीक्षक’ या ग्रंथात समीक्षेविषयीच्या काही मूलभूत प्रश्नांची मीमांसा करणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला असून यातील काही लेख मराठीतील काही महत्त्वाच्या समीक्षकांच्या वाङ्मयीन भूमिकेची चिकित्सा करणारे आहेत. समीक्षाव्यवहार हा एक उपरा आणि निरर्थक व्यवहार आहे, समीक्षा हे शास्त्र होऊ शकत नाही, अशांसारख्या मतांचा परामर्श या लेखांत घेण्यात आला आहे. यासमवेत समीक्षेचे स्वरूप, वाङ्मयव्यवहारात तिची उद्दिष्टे आणि वाङ्मयीन मूल्ये या संबंधीची चर्चा या लेखांत केली गेली आहे. समीक्षाविषयक तात्त्विक स्वरूपाच्या लेखांबरोबरच एकोणिसशे पन्नासनंतरच्या मराठीतील काही मान्यवर समीक्षकांच्या आणि सौंदर्यशास्त्राभ्यासकांच्या भूमिकांची सुस्पष्ट आणि तर्कशुद्ध आलोचना करणाऱ्या काही लेखांचा समावेशही या ग्रंथात करण्यात आला आहे. समीक्षकांवरच्या या लेखांमधून आधुनिक मराठी समीक्षेच्या वर्तमान स्थितीचे एक चित्रही वाचकांसमोर उभे राहते. समीक्षेविषयीच्या काही पायाभूत प्रश्नांच्या मीमांसेबरोबरच काही समीक्षकांच्या समीक्षेची ‘समीक्षा’ करणारा सुधीर रसाळ यांचा ‘समीक्षा आणि समीक्षक’ हा ग्रंथ वाङ्मयाभ्यासकांच्या आणि चिकित्सक वाचकांच्या विचारांना चालना देणारा ठरेल, याची खात्री वाटते.