Samar Likhit 8 Books combo Set (लेखक - समर | ८ पुस्तकांचा सेट )- 25% OFF
Samar Likhit 8 Books combo Set (लेखक - समर | ८ पुस्तकांचा सेट )- 25% OFF
Couldn't load pickup availability
Prebooking Is On.....
२५ मे नंतर बुक उपलब्ध
उर्मिला- 1. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या जीवनावर आधारित मराठी कादंबरी. 2. उर्मिलेच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समग्र जीवनाचे चित्रण करणारी पहिली कादंबरी. 3. मिथिलेतील बालपणापासून ते दोन राज्यांची राजमाता होईपर्यंत तिच्या जीवनाचे अनेक पैलू कादंबरीतून समोर येतात. 4. 'महाकाव्य शिवप्रताप', 'तथागत' (कादंबरी), ‘महाराजाधिराज’ (कादंबरी) आणि ‘महाभारतातील अद्भुत रहस्ये' लिहिणाऱ्या समर यांची कांदबरी!- (पाने -262)
राधा - श्रावणी नावाची बावीस वर्षीय तरूणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबाबत शांतपणे चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. श्रावणीला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ती राधेला ते प्रश्न विचारते. राधा त्या प्रश्नांची उत्तरं देतांना वृंदावनातील तिच्या आठवणीही सांगते. श्रीकृष्ण आणि राधेचं नातं श्रावणीला राधेच्या दृष्टीकोनातून समजतं. त्या दोघींच्या संवादातून प्रेम, पुरूष आणि नैतिकतेचे अनेक पैलू उलगडतात. तेच हे एक 'कादंबरीमय उपनिषद!'( पाने-200)
महाभारतातील १०८ अद्भुत रहस्य -महाभारतातील शस्त्रांचे मूळ श्लोकांच्या संदर्भासह वर्णन (श्लोकांचा अर्थही दिला आहे), अनेक अपरिचित कथा, तत्कालीन भारताचं वर्णन, देव-असूर संबंधावर प्रकाश, थक्क करणाऱ्या घटनांची माहिती अनेक रेखाचित्रांसह ! संग्रही असावेच असे पुस्तक! Description of weapons in Mahabharata with reference to original verses (the meaning of verses is also given), many unfamiliar stories, description of India at that time, the relationship between gods and demons, information about astonishing events with many sketches! A must-read book! 1. प्रत्येक प्रकरणात महाभारतातील मूळ श्लोक मराठी अर्थासह नमूद केला आहे. 2. १ लाखाहून अधिक श्लोक असणाऱ्या महाभारतातील निवडक १०८ थक्क करणाऱ्या कथा संदर्भासह पहिल्यांदाच उपलब्ध. 3. तत्कालिन भारताचे वर्णन. काश्मीर, केरळ अशा अनेक प्रदेशांचे वर्णन. 4. देव-असूर संबंधांवर प्रकाश. त्यांच्यातील संवाद आणि संघर्षाचे विवरण. 5. कौरव जन्मासारख्या प्रसंगांबाबत महाभारतात नेमके काय भाष्य आहे, त्याचे स्पष्टीकरण. कवीने नोंदवलेल्या तंत्राचे वर्णन. 6. शेकडो विमानांचा उल्लेख व कृष्ण-अर्जुन वापरलेल्या विमानांची माहिती. 7. विशेष प्रसिद्ध नसणाऱ्या कौरव आणि पांडवांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या घटना 8. अनेक रेखाचित्र आणि चार मोठी व्यक्तिचित्र! 9. श्रीकृष्णांनी लढलेल्या विविध युद्धांची माहिती व कल्पना येण्यासाठी नकाशा. 10. शांतीपर्वातील राज्यशास्त्रीय बऱ्यावाईट नियमांचे विवरण. तत्कालिन समाजरचनेची माहिती.(पाने-244)
महाराजाधिराज - गुप्त साम्राज्याचं सुवर्णयुग साकारणाऱ्या श्री समुद्रगुप्तांच्या जीवनावर आधारित कादंबरी! ऐतिहासिक साधनांच्या आधारे समुद्रगुप्तांच्या वैयक्तिक जीवनाचं आणि त्यांनी लढलेल्या युद्धांचं चित्रण! 'समुद्रगुप्त : एक चिंतन' या परिशिष्टासह! A novel based on the life of Shri Samudragupta who establihsed the golden age of the Gupta Empire! Depiction of Samudragupta's personal life and the wars he fought on the basis of historical sources! With an Appendix 'Samudragupta : Ek Chintan'! 1.सम्राट समुद्रगुप्तांच्या समग्र जीवनावर आधारित कादंबरी. 2. 'समुद्रगुप्त : एक चिंतन' या परिशिष्टातून अनेक ऐतिहासिक तथ्य आणि कादंबरीतील विविध प्रसंगांमागील संदर्भ वाचकांसमोर ठेवले आहेत. 3. अगदी बंधूंसह झालेल्या संघर्षापासून दक्षिणापथातील गर्द अरण्यांमध्ये युद्ध करण्यापर्यंत अनेक आव्हानात्मक परिस्थितींना समुद्रगुप्तांनी कसे तोंड दिले, त्याचे वर्णन. 4. शिवपूर्व काळात ‘परमभागवत’ ही उपाधी धारण करणाऱ्या सम्राट समुद्रगुप्तांचा धार्मिक स्वभाव, अश्वमेध यज्ञ आणि धार्मिक कार्याचे वर्णन. 5. अतिशय उत्तम (प्रिमिअम) कागदाचा वापर आणि मजबूत बांधणी.(पाने-294)
तथागत – ★ कादंबरी आत्मनिवेदन शैलीत लिहिली आहे. तथागतांच्या जीवनातील मुख्य व्यक्तिरेखा वाचकांना तथागतांचे चरित्र सांगतात, अशी रचना आहे. ★ तथागत गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा, पिता शुद्धोधन, शिष्य सारिपुत्त, शिष्या खेमा अशा एकूण ६ व्यक्तिरेखा कथा सांगतात. ★ कादंबरी ५०२ पानांची आहे. उत्तम बांधणी, UV कोटिंगचे मुखपृष्ठ आणि व्यक्तिचित्रांमुळे वाचकांना अधिक प्रभावित करावे, असा प्रयत्न आहे. ★ तथागतांच्या जीवनाचे अनेक अज्ञात पैलू यातून उलगडतात. जन्म ते निर्वाण हा संपूर्ण प्रवास कादंबरीत आला आहे. ★ सत्याचा शोध आणि सामाजिक क्रांती हादेखील कादंबरीचा प्रमुख विषय आहे. वाचकांनी या कादंबरीचे स्वागत करावे आणि ही कादंबरी वाचून अवश्य अभिप्राय कळवावा.(पाने-390)
समुद्रमंथन -‘समुद्रमंथन’ ही कादंबरी पूर्वी ‘रेवन रॉय’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाली होती. कथा - रेवन रॉय नावाचा निराशावादी मानसशास्त्रज्ञ विश्वाला संपवण्याची एक अनोखी योजना आखतो. तो सात समविचारी सहकारीही मिळवतो. पण... समांतर विश्वातील (parallel universe) तोच रेवन रॉय हा एक सज्जन आणि प्रेमळ गृहस्थ असतो. त्याला दुसऱ्या विश्वातील रेवन रॉयचा भयंकर प्रयोग समजतो, तेव्हा त्याच्यासमोर विश्वाला वाचवण्याचं आव्हान उभं राहतं. समांतर विश्वातील रेवन त्याच्याच दुसऱ्या भागाला, अर्थात आपल्या विश्वातील रेवन रॉयला, थांबवू शकेल का? आणि हे सगळं घडतं फक्त १२ तासांत !(पाने-204)
धर्म - कर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्य हे तिघे निघाले आहेत धर्माच्या शोधात. या विश्वात धर्म कुठे आहे? त्याची खरी व्याख्या काय? अधर्म फक्त कौरवांचा आणि धर्म फक्त पांडवांचा, असं म्हणणं उचित ठरेल का? या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत. या शोधात ते पोहोचले आहेत कोकणातील एका धर्मप्रवण गावात. तिथे काय होईल? त्यांचा शोध पूर्ण होईल का?(पाने-226)
पार्वतीच्या जन्मापासूनच कथा सुरू होते. पार्वतीला तीच सती आहे हे कुणी सांगितलं? तिचा भगवान शंकरांशी विवाह होताना त्याबाबत पार्वतीच्या मातेचं मत काय होतं? पार्वतीने कोणतं युद्ध लढलं? या प्रश्नांच्या उत्तरांसह गणेशाच्या जन्माची पुराणातील एक अपरिचित कथा, कार्तिकेयाची कथा, 'काली'चं रूप आणि मुख्य म्हणजे शंकर-पार्वती संवाद या कादंबरीत वाचकांना वाचता येईल.(पाने-214)