Samajik Chalvaliche Aitihasic Calender By Eknath Somkuwar (सामाजिक चळवळीचे ऐतिहासिक कॅलेंडर)
Samajik Chalvaliche Aitihasic Calender By Eknath Somkuwar (सामाजिक चळवळीचे ऐतिहासिक कॅलेंडर)
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राला प्रबोधनाची अतिशय दीर्घ परंपरा लाभली आहे. या प्रबोधनाच्या परंपरेतील महत्त्वाचे टप्पे म्हणजे महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या तिघांच्या जीवनकार्यातील घटनाक्रम अतिशय सोप्या पद्धतीने, अभ्यासकांना तसेच जिज्ञासू वाचकांना, विद्यार्थ्यांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना उपयोगी होईल, अशा रीतीने अॅड. एकनाथ सोमकुवर यांनी तारखेनुसार संकलित केला आहे. या पुस्तकाची संकल्पना अतिशय नावीन्यपूर्ण आहे. १ जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत वर्षातील प्रत्येक तारखेला महात्मा जोतीराव फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे अतिशय विस्तृत परंतु काटेकोर संकलन त्यांनी केले आहे. मराठी भाषेमधील हा असा पहिलाच प्रयत्न आहे. म्हणूनच या ग्रंथाचे मोल अनन्यसाधारण असेच आहे. महाराष्ट्रातील जिज्ञासू वाचक आणि अभ्यासक; तसेच विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व स्तरांतून या पुस्तकाचे स्वागत होईल; ; या सर्वांसाठीच हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल असा विश्वास वाटतो.