Skip to product information
1 of 2

Salimanama (सलीमनामा)

Salimanama (सलीमनामा)

Regular price Rs. 425.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 425.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

Salimanama (सलीमनामा)

लेखक- अनिता पाध्ये 

पाने- १४३

माझ्या अभिनय कारकीर्दीला तोपर्यंत सात वर्षं झाली होती; परंतु मनासारख्या भूमिका व फार यश मिळत नसल्यामुळे मनाला एक प्रकारची उदासीनता आली होती. मी मुंबईला आलो होतो, तेव्हा माझं वय २३ होतं आणि आता मी ३० वर्षांचा झालो होतो. अभिनयाला रामराम ठोकला, तर दुसरं काय करायचं, हा फार मोठा प्रश्न होता. नोकरीचं वय उलटलं होतं. ३० वर्षांच्या तरुणाला सरकारी नोकरी वा एअरफोर्सची नोकरी करणं शक्य नव्हतं. मी क्रिकेट चांगला खेळत असलो तरी क्रिकेट किंवा दुसऱ्या कुठल्या खेळामध्येसुद्धा मी आऊट ऑफ एज झालो होतो. पलसियाला परत जाऊन दुसरं काही काम करायचं म्हणजे माझं चांगलंच हसं झालं असतं. 'बघा २०-२५ चित्रपटांत काम करूनही याचं काही झालं नाही म्हणून शेवटी परत आला,' असं मला हिणवलं गेलं असतं. मुंबईला यायला निघालो होतो, तेव्हा मी मित्रमंडळींसमोर फुशारकी मारली होती की, मैं दिलीपकुमार की छुट्टी कर दूंगा, देखो. कुठला व्यवसाय करायचं याचं ज्ञान मला नव्हतं. त्यासाठी लागणारं भांडवल माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे मुंबईतच काही करायचं, हे मी मनाशी पक्कं केलं; पण करायचं काय?

View full details