Sakshibhavane Baghatana By Aruna Dhere, Jayashri Joshi (साक्षीभावाने बघताना)
Sakshibhavane Baghatana By Aruna Dhere, Jayashri Joshi (साक्षीभावाने बघताना)
पोएट टू पोएट’ या अभिनव संकल्पनेतून सुप्रसिद्ध प्रतिभावान जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर हिच्या निवडक जर्मन कवितांचं अरुणा ढेरे व जयश्री हरि जोशी यांनी साकारलेलं अनुसर्जन…
वेगवेगळ्या देशांतले भूप्रदेश तिथल्या सांस्कृतिक संदर्भांसकट उलरिकं यांच्या काव्यात्म अनुभवाचा भाग झालेले आहेत. त्यामुळे मराठी कवयित्रींच्या अनुभवविश्वापेक्षा तिचं अगदी निराळं आणि समृद्ध असं अनुभवाचं जग तिच्या कवितांमधून समोर येतं.
सांस्कृतिक संदर्भांपासून पूर्ण मुक्त अशा स्त्रीशरीराच्या अनुभवापासून थेट मानवजातीच्या उत्क्रांतीच्या इतिहासापर्यंत आणि स्त्रीपुरुष संबंधातल्या ताण्याबाण्यापासून बर्लिनच्या भूत-वर्तमानापर्यंत तिच्या कवितेचा विस्तृत पैस आहे…
– अरुणा ढेरे
ही कविता ध्वनीचे बोट धरून दृश्यप्रतिमांची उकल करते. उलरिकंला शब्दांचे खेळ करायला आवडतात. नवीन शब्दांचे सर्जन करण्यात तिचा हातखंडा आहे.
दृश्य रूप हे तिच्या कवितेचे विशेष लक्षण आहे. उलरिकंची कविता माणसा-माणसांतील समीकरणं आणि लालसा, त्यांच्या भावनांचे खेळ, आकांक्षाचे ओझे हे जगाच्या पाठीवर सारखेच असते हे दाखवून देणारी.
– जयश्री हरि जोशी