Sahityatil Upeksheche Samajshastra By Nagnath Kottapalle (साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र)
Sahityatil Upeksheche Samajshastra By Nagnath Kottapalle (साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र)
Couldn't load pickup availability
जीवनाच्या एखाद्या क्षेत्रातील कार्य असो की ललित- वैचारिक लेखन, महत्त्वाचे काम करूनही काही व्यक्तींच्या वाट्याला उपेक्षाच येते. लेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर म. फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, लोकहितवादी यांच्यापासून किरण नगरकर, बाबूराव बागूल यांच्यापर्यंत अनेक उदाहरणे या संदर्भाने सांगता येतील. उपेक्षा वाट्याला येण्याची काही सामाजिक कारणे असू शकतात का? असतील तर ती नेमकी कोणती ? ही उपेक्षा अनवधानाने घडते की ठरवून केली जाते की एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीचा ती अपरिहार्य परिणाम असते? यामध्ये समीक्षक, वाङ्मयेतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक्रम ठरविणारे विद्वान इत्यादी घटकांची जबाबदारी किती आणि कोणती ? या सर्व घटकांचा नेमका काय परिणाम होतो ? ते कसे कार्यरत होतात? 'का' कार्यरत होतात? यामध्ये सांस्कृतिक- सामाजिक- वाङ्मयीन कार्य करणाऱ्या संस्थांची भूमिका काय असते? या सर्व घटकांवर अन्य घटकांचा दबाव असू शकतो का ? तसे असेल तर त्यातून निर्माण होणारी सत्तास्थाने कोणती ? त्यातून निर्माण होणारे ताणतणाव कोणते? वाङ्मयीन गुणवत्तेचे काही निकष असू शकतात का ? ते कसे ठरतात? ते सोयीने ठरवण्यासाठी मुद्दाम काही सिद्धांत तयार केले जातात काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयासातून या पुस्तकाच्या स्वरूपात आपल्यासमोर येत असणारे 'साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र' अभ्यासू वाचकांना नवीन दिशा दाखवणारे आणि अभ्यासासाठी नवीन दालन खुले करणारे ठरेल यात शंकाच नाही.