Skip to product information
1 of 1

Sahitya Shidori (साहित्य शिदोरी)

Sahitya Shidori (साहित्य शिदोरी)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

प्रसिद्ध कादंबरीकार ओरहान पामुक यांनी म्हटले आहे - "मी एके दिवशी एक पुस्तक वाचले आणि माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.

"लेखक आणि वाचकांना एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात स्टोरीमिररची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक कथा आपल्याला काहीतरी शिकवते, विचार करायला लावते आणि काही भावपूर्ण चिंतन करण्याची संधी देते.

या धकाधकीच्या आणि नीरस जीवनात, एक कथापुस्तक आपल्याला स्वप्न बघण्यास मदत करू शकते, जीवनात नवचैतन्य निर्माण करू शकते, आपल्याला आशा देऊ शकते आणि काही कथा आपल्या दैनंदिन समस्यांना तोंड देण्याचे धैर्य देखील देऊ शकतात. जॉर्ज सॉन्डर्स बरोबरच म्हटले आहे, "जेव्हा तुम्ही एखादी छोटी कथा वाचता, तेव्हा तुम्ही थोडे अधिक जागरूक आणि तुमच्या सभोवतालच्या जगाच्या प्रेमात पडता.

स्टोरीमिरर वरील रंजक आशयाच्या भरमसाठ कथांमधून मूठभर कथा निवडणे हे अवघड काम आहे. पण, या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही अतिशय उत्तम कथा निवडून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे होतकरू लेखकांची मेहनत, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे परिणाम आहेत.

लेखकांनी त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि लेखन कौशल्याला आव्हान देऊन, मनमोहक, आकर्षक आणि सुंदर कथा रचना आपल्यासमोर सादर केल्या आहेत. लघुकथांचा हा संग्रह वाचकांना उत्तमोत्तम कथांपर्यंत पोहोचण्याची संधी देईल आणि स्टोरीमिरर वेबसाईटवरील उत्कृष्ट कार्य आणि व्यापक साहित्य निधीची साक्ष देईल..

आम्हाला आशा आहे की हा कथासंग्रह तुमच्या हृदयाला आणि आत्म्याला स्पर्श करेल, तसेच तुम्हाला वाचनाचा उत्तम अनुभव देईल!

View full details
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
Loader