Sahaj Suchal Mhanun By Ulka Mokasdar (सहज सुचलं म्हणून.. )
Sahaj Suchal Mhanun By Ulka Mokasdar (सहज सुचलं म्हणून.. )
Couldn't load pickup availability
होत असं कधी तरी, एकादी गोष्ट मनाला वाऱ्याच्या झुळकी सारखी स्पर्श करून जाते. हातात पकडता येत नाही ती, पण आठवणींच्या संदुकीत ती जपली जाते आणि गारवा हवा असतो तेव्हा संदुकीतून काढली जाते.. तसच काहीस हे लेख लिहिताना झालं. कोणत्या विषयाला स्पर्श करायचा अस ठरवून, मग दिशा धरून चालणं नव्हतं ते.. तर तो होता एक प्रवास आणि मी होते पांथेय. ह्या प्रवासात अनेक क्षण आले, अनेक झुळका आल्या, अनेक गारवे देणारे क्षण सापडले आणि अनेक चटका लावणारे कण ही. त्या त्या काळात मी त्या क्षणाचा, एक लहानसा कण झाले.. हसले, रडले पण नंतर त्या प्रवासाला नकळत शब्दांच रूप ही प्राप्त झालं. आणि काठावरून पहाताना मनाच्या अथांग खोलीत काहीतरी डहुळल... पाह्यलं तर ह्या लेखांचं प्रतिबिंब अलगद तरंगत होत... अनेक लाटांच्या रूपात. वेचायच ठरवलं तर कोणत्या पात्रात वेचाव? कारण प्रत्येक शब्दांचा, भावांचा, लेखांचा अर्थ भावार्थ, अन्वयार्थ हा वेगळ्या रूपात सामोरा येत होता, एखाद्या मोरापिसाच्या अनेक रंग छटा घेऊन. रंगांच्या छटा का कधी हातात धरता येतात, त्याचं प्रारूप दिशा बदलाव तस बदलत जात... माझ्या भावना ही तशाच. प्रारुपा सारख्या सहज रेशम लडित उलगडत जाणाऱ्या. मनाला भावल्या तशा लेखणीतून उतरलेल्या... मग ह्या लेखणीला नाव तरी काय देऊ?
कारण ही लेखणी उचलली तीच सहज सुचलं म्हणून...
Share
