Sachhi Ramayan By E V Ramasami Periyar, Sagar Bhaleral(Translators) सच्ची रामायण
Sachhi Ramayan By E V Ramasami Periyar, Sagar Bhaleral(Translators) सच्ची रामायण
सच्ची रामायण’ हे ई. वी. रामासामी नायकर पेरियार’ यांचे सर्वाधिक चर्चेत असलेले आणि वादग्रस्त पुस्तक आहे. पेरियार रामायणाला एक राजकीय ग्रंथ मानत. ते म्हणत की दक्षिणेतील अनार्य लोकांवर उत्तरेतील आयांनी मिळवलेल्या विजयाला आणि वर्चस्वाला अधोरेखित करण्यासाठी रामायण लिहिले गेले. सोबतच ब्राह्मणेतरांवर ब्राह्मणांचे आणि स्त्रियांवर पुरुषांचे वर्चस्व निर्माण करण्याचे हे एक साधन आहे असे ते मानत.
रामायणातील मूळ आशय उलगडण्यासाठी पेरियार यांनी वाल्मिकी रामायण’ आणि इतर राम कथांचे अनुवाद, जसे की कम रामायण, तुलसीदास रामायण’, ‘रामचरितमानस, चौद्ध रामायण’, ‘जैन रामायण इत्यादींचा जवळपास चालीस वर्षांहून अधिक काळ सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी रामायण पादीरंगल (रामायणातील पात्रे) या पुस्तकात रामायणाची टीकात्मक समीक्षा केली. हे पुस्तक १९४४ मध्ये तामिळ भाषेत प्रकाशित झाले.
त्याची इंग्रजी आवृत्ती १९५९साली ‘द रामायण: अ टू रीडिंग’ या नावाने प्रकाशित झाली. उत्तर भारतातील लोकप्रिय बहुजन कार्यकतें ललई सिंग यादव यांनी १९६८ साली हे पुस्तक हिंदीत सच्ची रामायण’ नावाने प्रकाशित केले. ९ डिसेंबर १९६९ रोजी तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने त्यावर बंदी घातली आणि पुस्तके जप्त