Rokthok By Rajendra Bobade (रोकठोक मनातलं)
Rokthok By Rajendra Bobade (रोकठोक मनातलं)
Couldn't load pickup availability
शब्दांना केवळ अर्थ नसतो, तर त्यांना एक स्वतःचा इतिहास, भूगोल आणि गंधही असतो. श्री. राजेंद्र बोबडे लिखित ‘रोखठोक मनातलं’ हे पुस्तक म्हणजे अशाच विविध शब्दांच्या निमित्ताने केलेले, जीवनाचा वेध घेणारे एक मुक्तचिंतन आहे.
गेल्या दोन तपांहून अधिक काळ ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या लेखकाने आपल्या दांडग्या अनुभवातून हे विचारधन वाचकांसाठी खुले केले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे याची रचना. यात ‘कष्ट’, ‘निसर्ग’, ‘संघटन’, ‘सत्ता’, ‘धन’, ‘बाजार’ यांसारख्या आपल्या परिचयाच्या रूढ शब्दांपासून ते ‘तिकाटणे’, ‘वळचण’, ‘दुलदुले’, ‘नड’ अशा काळाच्या ओघात नामशेष होत चाललेल्या अस्सल गावरान शब्दांपर्यंतचा प्रवास घडतो.
लेखकाने या शब्दांभोवती गुंफलेले चिंतन इतके ऊर्जस्वल आणि प्रभावी आहे की, ते वाचकाला क्षणात आपल्याशी जोडून घेते आणि विचारप्रवण करते. लेखकाची समाजात वावरतानाची सूक्ष्म निरीक्षणक्षमता आणि सामाजिक-राजकीय परिस्थितीचे भान या लेखनातून प्रकर्षाने जाणवते. जे ‘जसे आहे, तसे मांडण्याचे’ एक सत्याग्रही धारिष्ट्य या पुस्तकात तुम्हाला अनुभवायला मिळेल.
आपल्या मातीतील शब्द आणि त्यामागचा विचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे!
Share
