Skip to product information
1 of 2

Raw Marathi - रॉ (मराठी) By Anusha Nandakumar + Mosad - मोसाद By Mark Wargo ( 2 books combo set)

Raw Marathi - रॉ (मराठी) By Anusha Nandakumar + Mosad - मोसाद By Mark Wargo ( 2 books combo set)

Regular price Rs. 679.00
Regular price Rs. 799.00 Sale price Rs. 679.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Raw Marathi - रॉ (मराठी)-
माहिती ही ताकद असते, असे म्हटले जाते आणि इतर कुठल्याही यंत्रणेपेक्षा ही गोष्ट गुप्तचर यंत्रणांना अतिशय चपखलपणे लागू होते.भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंगच्या म्हणजेच ‘रॉ’च्या संस्थापक-प्रमुखाने प्रसिद्धीच्या झगमगाटापासून अतिशय दूर राहून काम करण्यास आणि जगण्यास प्राधान्य दिले. संयतपणे आणि सुसंस्कृतपणाने काम करत राहिल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले नसले तरी काव यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेला जागतिक नकाशावर नेऊन ठेवले यात कसलीच शंका नाही. या उत्कंठापूर्ण आणि वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकात अनुषा नंदकुमार आणि संदीप साकेत यांनी आधुनिक भारतीय गुप्तहेर यंत्रणेचा पाया कसा घातला गेला, याचा मागोवा घेतला आहे आणि नव्यानेच स्थापन झालेल्या ‘रॉ’ने बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून

देण्यात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची रोचक माहिती दिली आहे.

 
Mosad - मोसाद -मोसाद या पुस्तकात मोसादने पार पाडलेल्या गोपनीय मोहिमांचे वर्णन केले आहे. या मोहिमा मोसादच्या विकासामध्ये त्याचे स्वरूप निश्चित करणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना ठरल्या आहेत. १९७२च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या इस्रायली खेळाडूंची ‘ब्लॅक सप्टेंबर’ संघटनेच्या अतिरेक्यांनी हत्या केली. या अतिरेक्यांचा माग काढत त्यांना एकेक करून संपवण्याची मोहीम, इस्रायलच्या गुप्तपणे राबवण्यात येणाऱ्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी ‘येलोकेक’ युरेनियमचा साठा हस्तगत करण्याची मोहीम आणि नाझी युद्ध गुन्हेगार अॅडॉल्फ आईकमन याचे अपहरण करत त्याचा जाहीर न्यायनिवाडा घडवून आणण्याची मोहीम अशा महत्त्वपूर्ण मोहिमांचे वर्णन या पुस्तकात केले आहे.

View full details