Rashtraveer Chhatrapati Sambhajiraje By Dr. Pramod Bankhele [राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे ]
Rashtraveer Chhatrapati Sambhajiraje By Dr. Pramod Bankhele [राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे ]
Couldn't load pickup availability
राजश्री आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य." हा महामंत्र छातीशी कवटाळून संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हातात घेतली. महत्वाच्या पदांवरच्या स्वकीयांची फितुरी, प्रचंड सेनासागर घेऊन संबंध दक्षिणेचा घास घ्यायला दख्खनेत उतरलेला आलमगीर औरंगजेब, पोर्तुगेज- सिद्दी अश्या जगाच्या पाठीवर नानावलेल्या आरमारी सत्तांशी एकाच वेळी सुरु असलेला निर्णायक संघर्ष, ब्रिटिशांचं कावेबाज राजकारण या सगळ्या एकाच वेळी चालून आलेल्या वादळांना संभाजी महाराजांनी एकहाती जबरदस्त टक्कर दिली. औरंगजेबाची धडक एवढी प्रचंड होती की त्या धडकेत दक्षिणेत कित्त्येक वर्षांपासून घट्ट मुळं रोवून थांबलेल्या आदिलशाही आणि कुतुबशाहीसारख्या मातब्बर शाह्याही पत्त्यासारख्या ढासळल्या. याउलट तुलनेनं अतिशय तरुण असलेलं 'शिवछत्रपतींचं स्वराज्य' मात्र संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली फक्त स्वःसंरक्षणार्थ नाही तर 'दक्षिणेची पादशाही दक्षणियाच्या हाती' राहावी या शिवछत्रपतींच्या राष्ट्रवादी दूरदृष्टीपायी संबंध दक्षिणेचा कैवार घेऊन निर्वाणीचा लढा देत होतं. हा लढा एवढा चिवट होता की आशिया खंडातल्या सर्वात शक्तिशाली राजाला, औरंगजेबाला स्वतःच्या डोक्यावरची पगडी रागाच्या भरात जमिनीवर फेकावी लागली.