Ranmeva By Sandip Khurud (रानमेवा)
Ranmeva By Sandip Khurud (रानमेवा)
Couldn't load pickup availability
संदीप खुरुद यांच्या ‘रानमेवा’ संग्रहातील गोष्टी अस्सल आहेत. मातीतल्या आहेत. अनुभवलेल्या आहेत. त्यात उसनवारी नाही. कथेचा परिसर आणि पात्र जिवंत करायची सहजता त्यांच्यात आहे. स्वतःला थोर न मानणारे लेखक खूप निरागस वाटतात. निर्मळ वाटतात. त्यांच्या गोष्टी तुमच्या आमच्या असतात. दाद घेण्यासाठी ताणलेला आलाप नसतो. दिखाऊ स्वर नसतो.
संदीप खुरुद माणूस म्हणून साधे आहेत. त्यांची कथाही तशीच आहे. आव नसलेली. पण खूप काही सांगून जाणारी, विषयांची कमी नाही त्यांच्याकडे. स्वतःच्या प्रेमात पडलेली माणसं वारंवार आरसा पाहतात. स्वतः पलीकडे पण जग सुंदर आहे याची जाणीव असलेली माणसं गोष्टी टिपत राहतात. संदीप खरुद यांनी टिपलेल्या आणि सहजतेने मांडलेल्या गोष्टी वाचनीय आहेत. त्यांच्या पहिल्या वहिल्या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. रानमेवा वाटत रहावा. प्रत्येकाला भेटत रहावा. असेच लिहीत रहा आणि मन जिंकत रहा.
Share
