1
/
of
4
Ranmalyachi Vaat By Indrajit Bhalerao (रानमळ्याची वाट)
Ranmalyachi Vaat By Indrajit Bhalerao (रानमळ्याची वाट)
Regular price
Rs. 136.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 136.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'गावाकडं' या माझ्या मुलांसाठीच्या पहिल्या कवितासंग्रहानंतर ‘रानमळ्याची वाट' हा माझा मुलांसाठीचा दुसरा कवितासंग्रह तुमच्यासमोर आहे. पहिल्या संग्रहात मी तुम्हाला गावाकडं घेऊन गेलो होतो. इथल्या कवितांमधून मी तुम्हाला रानावनात घेऊन जाणार आहे. रानावनातल्या दगड-माती, झरे-ओढे, पाऊस-पाणी, पशु-पक्षी, झाडं-झुडपं यांना तुम्हाला भेटवणार आहे. हे सगळे नवे सवंगडी तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे. पुढच्या संग्रहातून मी तुम्हाला जंगलझाडीत घेऊन जाणार आहे. म्हणजे गावपांढरी, काळी आई आणि हिरवाई या जीवनाच्या तीनही मूलभूत रंगांचा परिचय तुम्हाला होईल. हळूहळू तुम्हाला निसर्गसन्मुख जगणं कळत जाईल आणि त्याची आवडही निर्माण होईल. असं खरंखुरं निसर्गसन्मुख जगणं तुमच्या वाट्याला यावं म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
Share
