Ramayan Khel Jeevansanchitacha (Bhag 2) By Shubh Vilas रामायण खेळ जीवनसंचिताचा (भाग २)
Ramayan Khel Jeevansanchitacha (Bhag 2) By Shubh Vilas रामायण खेळ जीवनसंचिताचा (भाग २)
रामायण ही केवळ एक कथा नाही. ही एक जीवनशैली आहे. हा एक जीवनसंचिताचा खेळ आहे. जीवन हे सुनिश्चित आणि आरामदायी असावे, अशी आपणा सर्वांची अपेक्षा असते. तथापि, वास्तवात तणाव, कठीण प्रसंग आणि अनपेक्षित संकटे आपल्याला त्रस्त करून सोडतात. रामायणातील प्रत्येक प्रसंग आपल्या आधुनिक जीवनातील कोंडीला आणि त्यावरील उपायाला प्रस्तुत करतात: * आव्हानांचा सामना सकारात्मक दृष्टीने करा. राम आपल्या अनेक शौर्यकार्याप्रसंगी अचल राहिले. * प्रलोभनांचा सामना करणे. समंजस भरताने घेतलेले काळजीपूर्वक निर्णय आणि नंतर त्याला निर्णय घेण्यास मिळालेले साहा, प्रलोभने टाळण्यास दिशा देतात. आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडणे. सीतेचा दृढ आत्मविश्वास हा आपल्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. जीवनात अचानक झालेल्या परिवर्तनाला आपण निराश न होता कसे सामोरे जातो? रामायण – खेळ जीवनसंचिताचा या मालिकेतील परिवर्तनाचे स्वागत हे दुसरे पुस्तक आहे. हे पुस्तक वाल्मीकींच्या महाकाव्यातील अयोध्याकांडावर आधारित आधुनिक कथन आहे. नशिबाचे पारडे फिरल्यावर काय करावे, याविषयी या पुस्तकात सांगितलेले आहे. मानवी संबंध आणि व्यवहाराचे गूढ़ नियम काय करावे, काय करू नये आणि या क्लिष्ट कोड्यातून कसा सुखरूप प्रवास करावा, याचे विस्तृत वर्णन लेखक शुभ विलास प्रस्तुत करीत आहेत.