Ramabai Bheemrao Ambedkar By Subhash Dharmaraj Kamble ( रमाबाई भीमराव आंबेडकर - सुभाष धर्मराज कांबळे )
Ramabai Bheemrao Ambedkar By Subhash Dharmaraj Kamble ( रमाबाई भीमराव आंबेडकर - सुभाष धर्मराज कांबळे )
Couldn't load pickup availability
राजमाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांचे समाजातील स्थान अत्यंत आदर्शवत आहे. रमाबाईचे चरित्र अनेक लेखकांनी लिहिले. रमाबाईंच्या संबंधी बाबासाहेबांनी सांगितलेल्या आठवणी, आप्तस्वकीयांनी तसेच इतर लेखकांनी आपआपल्या मनःचक्षुतून काढलेले अनुमान, तर्क यालाच चरित्र म्हणता येईल का? हे सांगता येत नाही. ज्यांनी ज्यांनी असे प्रयत्न केले, त्याचे स्वरूप काय होते? याची साधी प्रत मिळणेही मुश्किल झाले आहे. प्रस्तुत लेखकास देखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
आमच्या आईसाहेब रमाबाई भीमराव आंबेडकर या पुस्तकामध्ये रमाबाईंच्या लग्नापासून ते बाबासाहेबांनी 'पाकिस्तान' हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथातील प्रस्तावना पर्यंतच्या घटना चरित्राच्या अंग बनल्या होत्या. त्यामुळे चरित्र लेखनाचे निषक याठिकाणी उपयोगत आणता येत नाही. रमाबाईंच्या जन्मतारखेसंबंधीचा पुरावा उपलब्ध नाही.
या पुस्तकातील कित्येक प्रसंग हृदय पिळवटून टाकणारे आहेत. रमाबाईंना बाबासाहेबांच्या सुरक्षिततेसंबंधी वाटणारी चिंता अनाकलनीय होती. हे बाबासाहेबांनी रमाबाईस समजून सांगितले आणि त्या चिंतेतून मुक्त झाल्या की नाही, हे माहित नाही. पण 'भय' मात्र नव्हते. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, 'Cowards die many times before their death. Man dies when he wills to die.' भित्री माणसे मृत्यूपूर्वी अनेक वेळा मरत असतात, अर्थात त्याचे कारण भय. भयाचे कारण अज्ञान, त्यातून मुक्त होण्याचा उपाय म्हणजे खरे ज्ञान-निसर्ग नियमांचे ज्ञान. माणूस मरतो तो स्वतःच्या इच्छेने मरतो. माणसात मनुष्यपण येणे तितकेसे सोपे नाही. रमामातेच्या मधील मनुष्यपण जनावरांपेक्षा हीन जीवन जगणाऱ्या मानवाच्या प्रति समर्पित होते.
रमाबाईंचा समजूतदारपणा हा त्यांच्या स्वभावातून दिसून येतो. डब्लू. विल्सन म्हणतात, "समजूतदारपणाच्या बागेत मैत्रीची फुले फुलत असतात." या समजूतदारपणातून निर्माण होणारी 'मैत्री' ही शुद्ध मनाची खात्री देते. बाबासाहेब देखील रमामातेस 'सखी' संबोधतात. पाने 80
Share
