Skip to product information
1 of 5

Rama Marathe Combo Book set ( 5 Book Set)

Rama Marathe Combo Book set ( 5 Book Set)

Regular price Rs. 1,080.00
Regular price Rs. 1,350.00 Sale price Rs. 1,080.00
20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

1)  Hasat Jagavan - हसत जगावं- 250/- 
हसत जगावं ताण-तणावांचा 'अभ्यास' पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं 'इन्स्टंट' उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला; पण या ताण-तणावांचं व्यवस्थापन मात्र अजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून गेलंय, भारतीय संस्कृतीलाच. ताणस्थितीत अर्जुनाला सांगितलेली 'गीता' आणि पर्यायानं 'ज्ञानेश्वरी' हे या समस्येवरील आद्यग्रंथ होत. काळाच्या ओघात स्वयंभू तेजस्वितेनं तळपत राहिलेल्या या ग्रंथातील तत्त्वज्ञान नित्यनूतन प्रकाश आणि आधार देतच आहे... आणि म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानाचा पुनरुच्चार 'हसत जगावं' सांगताना मोठ्या तळमळीनं, तरीही सहजपणे प्रकटतो. आधुनिक वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांची यशस्वी सांगड घालणारं आगळंवेगळं पुस्तक. या आवृत्तीत अधिक काय वाचाल ? तणावग्रस्तता भान आणि ज्ञान मानसोपचार

2) Brain Programming - ब्रेन प्रोग्रॅमिंग- 250/-
हे पुस्तक तुम्हाला काय देईल ? तुमचं मन तुमच्या हाती आत्मविकासाची हरवलेली (गुरू) किल्ली ब्रेन प्रोग्रॅमिंग कसं होतं? 'ब्रेन प्रोग्रॅमिंग' बदलतं, तेव्हा चमत्कार घडतात. ब्रेन प्रोग्रॅमिंग तुमचं अवघं जीवन बदलू शकतं ! संवाद आपुला आपणाशी... ब्रेन प्रोग्रॅमिंगला लागलेला व्हायरस असाध्य ते साध्य मेंदू नावाचा 'अफलातून 'कॉम्प्युटर मेंदू करीत असलेली गल्लत तुम्ही रोजच महिप्नोटाइजफहोत असता ! तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सोनेरी स्वप्नांचे पंख भगतसिंग - रंग दे बसंती जेसिका लाल रंगीत तालीम 'ब्रेन प्रोग्रॅमिंग' कसं कराल? तथाऽस्तु ! तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता ! पॉवरफुल मेन-प्रोग्रॅम श्रद्धा आणि विश्वास अंधश्रद्धेचं बूमरँग तुमचं ब्रेन प्रोग्रॅमिंग - किती खरं ? किती खोटं ? बिघडलेलं ब्रेन प्रोग्रॅमिंग या टोपीखाली दडलंय काय? निगेटिव्ह ब्रेन प्रोग्रॅमिंग 'डिलीट' कसं कराल? ब्रेन प्रोग्रॅमिंगची भाषा ब्रेन प्रोग्रॅमिंगचं सॉफ्टवेअर, अॅन्टि-व्हायरस प्रोग्रॅम

3) Design The Career - डिझाईन द करियर - 300/-
क्षमता आणि आवड यानुसार सुयोग्य करिअरची निवड हा जीवनातील यशस्वितेचा पाया
असतो. उभ्या आयुष्याचा फैसला मात्र केला जातो, तुटपुंज्या माहितीवर! अनेकांना फक्त
हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच करिअर्स माहिती असतात. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स,
मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट… बस्स इतकंच काहीसं !
लक्षात घ्या, अशा ७००हून अधिक करिअर्स आहेत आणि ३०,००० हून अधिक कोर्सेस आहेत.
प्रत्येक माणूस हा विशिष्ट शारीरिक-भावनिक-बौद्धिक-सामाजिक-आत्मिक-
‘बुद्धिमतांचा कॉम्बो’ असतो; आणि प्रत्येक करिअरला विशिष्ट कॉम्बोची गरज असते. या
दोन्ही गोष्टी मॅच केल्या की झाले; तुम्ही त्या क्षेत्रात हिरो होणारच ! करिअर निवडीची दिशा
चुकल्यास मात्र पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
एकविसावं शतक स्पेशलायझेशनचं आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात उंच उंच जाण्याचं !
तुम्ही त्याच क्षेत्रात उंच जाऊ शकता ज्या क्षेत्रासाठी लागणारा विशिष्ट बुद्धिमत्तांचा कॉम्बो
तुमच्यात निसर्गतःच आहे. म्हणूनच योग्य करिअर निवडताना त्या व्यक्तीतील विशेष
बुद्धिमत्ता लक्षात घ्यायलाच हव्यात; कारण प्रत्येक मेंदूचं डिझाईन वेगळं असतं !
निरीक्षण, अनुभव यासोबत मानसशास्त्रीय चाचण्या अर्थात सायकॉलॉजिकल टेस्टस्,
व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
करिअर सक्सेस प्लॅन साठी महत्त्वाचा आहे शोध व्यक्तिमत्त्वाचा! ज्यामुळं होईल
ओळख आपुली आपणाशी!
आणि सापडेल दिशा जीवनाची!
करिअरची योग्य निवड, निर्णय, नियोजन आणि निश्चितता यासाठी प्रत्येकानं वाचलंच
पाहिजे असं पुस्तक….

4) Champion Vha ( चॅम्पियन व्हा) - 300/-
Champion Vha चॅम्पियन व्हा! पंचतंत्र नव्हे, पंच सूत्र !डॉ. रमा मराठे छोट्या दोस्तांनो, 'चॅम्पियन' व्हायचंय ? - मग खास तुमच्यासाठी आहे, पंचतंत्र; नव्हे पंचसूत्र ! प्रथितयश लेखिका डॉ. रमा मराठे यांच्या सिद्धहस्त लेखणीचा नवा आविष्कार ! तुम्हाला समजेल, अशा सहज-सोप्या भाषेत व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी गोष्टीरूप खजिना.. अभ्यास आरोग्य आत्मविकास ▶ संस्कार सामाजिक बांधिलकी ही पंचसूत्री करा आत्मसात आणि... गुणवंत व्हा ! यशवंत व्हा ! जयवंत व्हा ! सुखानं राज्य करा !

5)  Ase Ghadava Mulanche Vyaktimattva - असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्त्व - 250/-
मनुष्य हा एकच प्राणी असा आहे ज्याला जीवनातल्या काही सहज प्रक्रियासुद्धा मुद्दाम शिकून घ्याव्या लागतात, संस्कारित कराव्या लागतात… माणसांची बौद्धिक आणि भावनिक क्षितिजं रुंदावत असल्यानं असेल कदाचित. आजच्या धकाधकीच्या जीवनात तर याची गरज फार जाणवते आहे.दैनंदिन रहाटगाडग्याला बांधलेल्या अन् छोट्या-छोट्या कुटुंबात राहणाऱ्या आजच्या माता-पित्यांना आपली मुलं अपेक्षेप्रमाणं वाढवणं सुकर राहिलेलं नाही.वाढती स्पर्धा, मानसिक ताणतणाव, होमवर्कचा दबाव, अपुरा खेळ, टीव्हीचं आक्रमण, खचणारा सांस्कृतिक पाया अशा सर्व अडथळ्यांतून मुलांचं व्यक्तिमत्त्व कसं जोपासावं अन् पालकत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार कशी पाडावी याचा साध्या, सोप्या, अकृत्रिम भाषेत मूलमंत्र देणारे हे पुस्तक पालकांना निश्चितच उपयोगी पडेल.

View full details