Ram Bhag 1 ani 2 By Rajendra Kher ( राम भाग १ ,भाग २)
Ram Bhag 1 ani 2 By Rajendra Kher ( राम भाग १ ,भाग २)
Couldn't load pickup availability
Ram Aryavartache Punarutthan- Bhag 1
वाल्मिकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात , परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षाचा दैदिप्यमान इतिहास आहे . रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचे स्वरूप आणि कार्य ,जटायूचं वास्तविक स्वरूप ,वानरे,पुष्पक विमान ,रावणाचे साम्राज्य ,दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण ,आदी गोष्टी ,घटना आजच्या शोधांशी ताडून पहिल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचत आहोत याचा अनुभव देणारे पुस्तक
Ram: Tretayugacha Mahasangram - Bhag 2
रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु; ही कादंबरी वाचताना ते प्रसंग कल्पित नसून वाल्मीकींनी वास्तविक इतिहासच लिहिला आहे, याचा साक्षात अनुभव वाचकांना मिळत जाईल. उदा. रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचं स्वरूप आणि कार्य, अहल्येचा प्रसंग, राक्षसांची वर्णनं, गृध्र जटायूचं वास्तविक स्वरूप, वानरांची वास्तविकता, पुष्पक विमानाचं स्वरूप, सीतेच्या मुखातून केले गेलेले विमानाचे थेट उल्लेख, रावणाचं साम्राज्य, दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण, राक्षसांची निर्मिती आदी गोष्टी-घटना आजच्या शोधांशी ताडून बघितल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचतो आहोत याचा अनुभव वाचकांना मिळेल.
Share
