Raktrekha By Shashi Bhagwat (रक्त रेखा - शशी भागवत )
Raktrekha By Shashi Bhagwat (रक्त रेखा - शशी भागवत )
Couldn't load pickup availability
पुन्नः प्रहार।
सोलापूरच्या, कानडी ढंगाने मराठी भाषा बोलणाऱ्या शशी भागवताने 'मराठी विषय घेऊन कसाबसा मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश मिळविला... आणि आठ दिवसात प्रा. बा. ल. कुलकर्णी यांनी त्याला 'मराठी' च्या बाहेरची वाट दाखविली, माझे 'मराठी चांगले नसावे. कदाचित मुलींच्या देखत झालेला तो मानभंग मला बोचला आणि मला लेखक करून गेला, पण नाही! मी लहानपणी शाळेतही काहीबाही लिहीत होतोच पण तरीही हे तेवढ्यामुळेच घडले असावे, असेही नाही... त्याला अगम्य, अतर्क्स असे काही वेगळेच कारण असावे- मागील जन्मी माझे हे अपूर्ण राहिलेले कर्म ही असण्याचा संभव आहे, म्हणजे हा पुनर्जन्म...?
होय, पुन:र्जन्मावर निदान माझा तरी विश्वास आहे... त्या शिवाय 'कर्म' ह्या गोष्टीला काही अर्थच नाही.
आज ह्या गोष्टीला काही अर्थच नाही...!
आज ह्या 'स्क्तरेखे ला साक्षी ठेवून 'मी' संकल्प सोडतो आहे... मी आज लिहिणार आहे, ते पुन:र्जन्मवर...! 'पुन्नः प्रहार' !
ज्याच्या त्याच्या कर्माचा! गतजन्मच्या 'कर्मा'चा ! कारण 'कर्मा' वाचून खरे असे काहीच नाही...! पाने 776
Share
