Skip to product information
1 of 1

Rajarshi Shahu , Karmaveer Bhaurao Patil Aani Prabodhankar Thakray By Dr. Jaysing Patil (राजर्षी शाहू , कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे- डॉ. जयसिंगराव पवार)

Rajarshi Shahu , Karmaveer Bhaurao Patil Aani Prabodhankar Thakray By Dr. Jaysing Patil (राजर्षी शाहू , कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे- डॉ. जयसिंगराव पवार)

Regular price Rs. 130.00
Regular price Rs. 130.00 Sale price Rs. 130.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

पाने ७६ 

शाहू महाराज, भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे या तीन समाजधुरीणांचं कार्य अधोरेखित करणारं, या तिघांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं आणि या तिघांमधील संबंधांचं दर्शन घडविणारं पुस्तक म्हणजे राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे. यातील पहिल्या प्रकरणात या तिघांमधील संबंधांचं स्वरूप विशद केलं आहे. या तिघांच्या कार्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली आहे. शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संबंधांचा सविस्तर वेध घेतला आहे. डांबर प्रकरणाचा ओझरता उल्लेख या प्रकरणात केला आहे. प्रबोधनकारांच्या मदतीसाठी शाहू महाराजांनी पाठवलेला चेक प्रबोधनकारांनी कसा बाणेदारपणे नाकारला याचीही हकिकत या प्रकरणात सांगितली आहे. अंबाबाईचा नायटा याचाही उल्लेख या प्रकरणात आढळतो. क्षात्रजगद्गुरू पदाचा वाद, सातारची राज्यक्रांती, शाहू महाराजांची आणि प्रबोधनकारांची शेवटची भेट, शाहू महाराजांची बदनामी केल्याचा प्रबोधनकारांवर केला गेलेला आरोप आणि त्यामुळे उठलेले वादळ, भाऊराव पाटील आणि प्रबोधनकारांचे संबंध, नोकरी सोडून भाऊरावांनी वसतिगृहे स्थापायचे ठरवले, त्यासाठी धनजीशहा कूपर या उद्योगपतीचा पैसा आणि स्वत:च्या व्यवस्थापकीय कौशल्यातून कारखान्याची निर्मिती, कारखान्याच्या उत्पन्नाचा ठरावीक भाग भाऊरावांना देण्यास कूपर राजी, पण प्रत्यक्षात वेळ आल्यावर कूपरने केलेला विश्वासघात, त्यामुळे भाऊरावांचे त्याला बंदुकीने ठार मारायला निघणे आणि प्रबोधनकारांनी त्यांना त्यापासून परावृत्त करणे, श्री शाहू बोर्डिंगची भाऊरावांनी केलेली स्थापना, वसतिगृहासाठी फंड जमवताना महात्मा गांधींशी ठाकऱ्यांची झालेली जुगलबंदी, १९२३च्या निवडणुकीत भाऊरावांनी कूपरला चारलेली धूळ, प्रबोधन मधून ठाकरे यांनी प्रकाशित केलेले भाऊरावांचे छोटेसे चरित्र इ. हकिकती या प्रकरणात आल्या आहेत. त्याचबरोबर ठाकरे आणि भाऊसाहेब यांच्या चरित्रांवर अधिक संशोधन होण्याची गरज व्यक्त केली आहे.

View full details