Rahasya Naganche : रहस्य नागांचे By Amish Tripathi
Rahasya Naganche : रहस्य नागांचे By Amish Tripathi
Couldn't load pickup availability
भगवान महादेवाच्या जीवनावर आधारित कादंबरी! पौराणिक कथा, पुरातत्त्वशास्त्र आणि परंपरा यावर आधारित असणारी भगवान शंकराची कथा वाचकाला खिळवून ठेवते. भारतातील दंतकथा, लोककथा आणि पुराणकथा यांचा हा अप्रतिम मिलाप आहे. देव, संस्कृती, इतिहास, असुर आणि नायक यांच्याविषयीचे आपले दृष्टिकोन कायमस्वरूपी बदलून टाकण्याचे सामर्थ्य या कथेत आहे. निलकंठाविषयीचे कोणते रहस्य यापुढे उलगडले जाणार आहे. याचे कुतूहल सतत वाढत जाते. आपल्या कर्मामुळे...कर्तृत्वामुळे एक पुरुष देवत्वापर्यंत कसा पोहोचला याची ही चित्तवेधक कहाणी आहे. प्राचीन भारताच्या समृद्ध पौराणिक परंपरेचा वेध या पुस्तकांमधून घेतला आहे. ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि कल्पनाविलास यांमधून हे पुस्तक आकाराला आले आहे. भगवान महादेवाच्या जीवनातून शिकवण घेत आपण सारेच जण अधिक चांगल्या व्यक्ती म्हणून जगू शकू. प्रत्येक व्यक्तीमध्ये देव बनण्याची क्षमता दडलेली असते, हा या कहाणीचा अन्वयार्थ आहे.
Share
