Rahasya By by Rhonda Byrne
Rahasya By by Rhonda Byrne
Couldn't load pickup availability
युगा न युगे चालत आलेलं हे महान रहस्य ! हे सर्वांना हवं होतं. हे गुप्त ठेवलं गेलं. लपविलं गेलं. हे चोरून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, प्रचंड किंमत देऊन मिळवण्याचाही यत्न केला गेला. शेकडो वर्ष जुनं पुराणं असं हे रहस्य इतिहासातील फक्त काही मोजक्या विख्यात लोकांना समजलेलं होतं: प्लेटो, गॅलिलिओ, बीथोवन, एडिसन, कार्नेगी, आईनस्टाईन तसेच इतर महान संशोधक, शास्त्रज्ञ, तत्वचिंतक, संतमहात्मे इत्यादी. आता मात्र हे रहस्य पुऱ्या दुनियेसमोर उलगडलं आहे.
" एकदा का हे रहस्य तुम्ही शिकून घेतलंत की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनू शकता. मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात, तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ ! तुमच्या व्यापकतेची, विशालतेची, खऱ्या शक्तीची जाणिव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचीही जे तुमची वाट पहातं आहे. "
Share
