Quiet, Ikigai, Elon Musk,Steve Jobs( Combo set)
Quiet, Ikigai, Elon Musk,Steve Jobs( Combo set)
Couldn't load pickup availability
इकिगाई- ‘इकिगाई हेच जपानमधील लोकांचं सकाळी उठण्यामागील प्रयोजन आहे.’ ‘तणावहीन, आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनशैलीचा जपानी मूलमंत्र : इकिगाई.’ - द टाइम्स हे प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान आजच्या काळासाठी अधिक समर्पक आणि पूरक ठरतं. या तत्त्वज्ञानामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकायची क्षमता आहे- ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी व्हाल. सुखी होण्याचे मूलभूत नियम समजून घ्या : कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या प्रमाणात करा... तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते बघा... तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावंसं वाटतं त्याचा शोध घ्या... छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा... तुमच्यामधील इकिगाई ओळखण्यासाठी, तिचा शोध घेण्यासाठी या असाधारण पुस्तकातील केन मोगी यांचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरेल.
एलोन मस्क- लौकिक अर्थाने यशस्वी असणार्या पालकांचं घर सतराव्या वर्षी सोडून भरारी घेणार्या एलॉन मस्कचा प्रवास दिसतो तितका चकचकीत, आकर्षक नाही. दक्षिण आफ्रिकेतील यादवीच्या काळात एका श्वेतवर्णीय मुलाने जन्म घेतला आणि हा मुलगा सगळ्याच अर्थांनी ‘वेगळा’ ठरला. प्रणेत्यांचा वारसा, भग्न कुटुंबाचे चटके, असामान्य बुद्धिमत्ता आणि विज्ञान काल्पनिका वास्तवात आणण्याच्या ध्यासातून जगाला मिळाला ‘एलॉन मस्क.’
अब्जाधीश, भविष्याचा शिल्पकार, वादाचा केंद्रबिंदू किंवा परोपकारी उद्योजक काहीही म्हणा; पण एलॉन आज जगातील सर्वांत श्रीमंत, प्रसिद्ध आणि ध्यासवेड्या लोकांच्या यादीत अग्रणी आहे. भूलोक, अंतराळ आणि पाताळ अशा त्रिलोकीचा स्वामी होण्याची स्वप्नं बाळगून असणार्या एलॉन मस्कला त्याचा ‘का?’ सापडला आहे आणि कदाचित मोठ्या, धाडसी कल्पनांकडे आपलं बोट धरून आपल्याला नेण्याचं काम एलॉनने केलं आहे. एलॉनचा हा अचाट, विस्मयकारक प्रवास आपल्यालाही मोठी स्वप्नं बघण्यास प्रवृत्त करेल हे नक्की.
स्टीव्ह जॉब्ज- स्टीव्ह जॉब्ज हा अशा महान अमेरिकन संशोधकांपैकी एक होता ज्यानं नेहमीच इतरांपेेक्षा वेगळ्या पद्धतीनं विचार केला. आपण हे जग बदलू शकू असा त्याला विश्वास होता आणि तसं करण्यासाठी आवश्यक असलेली असामान्य प्रतिभाही त्याच्यात होती.
- बराक ओबामा
स्टीव्ह जॉब्ज हा थॉमस एडिसननंतरचा सर्वांत महान संशोधक होता.
- स्टीव्हन स्पीलबर्ग
मी त्या निवडक भाग्यवान लोकांपैकी एक आहे, ज्यांना स्टीव्हबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
- बिल गेट्स
स्टीव्ह जॉब्ज हा कॉम्प्युटर युगाचा मायकल अँजेलो होता. त्यानं हे सिद्ध करून दाखविलं की, प्रतिभावान व्यक्तींसाठी महागडं आणि अभिजात शिक्षण हे आवश्यक असतंच असं नाही.
’क्वाएट- मूकपणे क्रांती घडवून आणणारे ’क्वाएट’
निसर्गत:च शांत आणि गंभीर किंवा संवेदनशील व्यक्तींकडे प्रदीर्घ काळापासून दुर्लक्ष करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे बोलण्यासारखेे फारसे काही नाही त्या व्यक्तीही मोठ्याने बोलून वरचढ ठरत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. मात्र आता प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकण्याची वेळ आली आहे. ही वेळ आहे अंतर्मुख व्यक्तींचे सामर्थ्य जोपासण्याची. ही वेळ आहे अंतर्मुख व्यक्तींचे शांततेचे महत्त्व समजून घेण्याची.
’’हे पुस्तक अंतर्मुखी स्वभावाच्या लोकांना स्वत:कडे एका संपूर्णत: नव्या प्रकाशात पाहण्यास भाग पाडेल.’’
- नाओमी वुल्फ
’’क्वाएटचा मध्यवर्ती सिद्धांत ताजी माहिती देणारा आणि महत्त्वाचा आहे. कदाचित ही वेळ आहे आपण सर्वांनी थांबून त्या शांततेच्या स्थिर आणि लहानशा आवाजाकडे लक्ष देण्याची.’’
- डेझी गुड्विन, संडे टाइम्स
’’लक्षणीय’’
- डेली मेल
’’समाजाचा अंतर्मुखींकडे पाहण्याचा दृठिकोन कायमस्वरूपी बदलणारे असामान्य पुस्तक.’’
- ठोचेन रुबिन, ’द हॅपिनेस प्रोजेक्ट’च्या लेखिका
Share
