Pustakanubhav By Dilip Phadke (पुस्तकानुभव)
Pustakanubhav By Dilip Phadke (पुस्तकानुभव)
Couldn't load pickup availability
प्रा. फडके सरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ही जुनी ग्रंथसंपदा मिळवली, ती वाचली आणि त्या विषयी परिचय स्वरूपात लिहून वाचकांच्या हाती दिली, हे कार्य मराठी साहित्यविश्वाच्या दृष्टिने दखलपात्र आहे. हा ज्ञानामृताचा घडा आपल्या सर्वांना समृद्ध करणारा आहे. नव्याचा ध्यास घेतानाच ‘जुनं ते सोनं’ हे या पुस्तकाने सप्रमाण सिद्ध केलं आहे. यातील पुस्तकांच्या विषयांचे वैविध्य बघितले तर कोणीही अचंबित होईल. आजच्या काळालाही मार्गदर्शक ठरतील असे विचारधन यात सामावलेले आहे.
ग्रंथ आणि प्रकाशन व्यवहारात अनेक बदल झाले असले तरी शंभर वर्षांपूर्वीचे हे वैभव आपल्या भाषेचा अभिजातपणा सिद्ध करणारे आहे. मराठीला आज जरी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी या पुस्तकानुभवाची अनुभूती घेताना आपल्या मनातील न्यूनगंड गळून पडेल. आपल्या अस्मितेच्या पाऊलखुणा आपले मनोधैर्य उंचावणार्या आणि आपल्याला बळकटी देणार्या आहेत. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेची चर्चा करताना हा पुस्तकानुभव मैलाचा दगड ठरेल हे नक्की.
Share
