Purush Te Purushach By Dr. Sanjay Patil (पुरुष ते पुरुषच)
Purush Te Purushach By Dr. Sanjay Patil (पुरुष ते पुरुषच)
Couldn't load pickup availability
हे पुस्तक पुरुष स्त्रीवर कसा अन्याय आणि अत्याचार करतो. तसेच पुरुष हा स्त्रीला फक्त एक वस्तू म्हणून वागणूक देतो आणि स्त्री ही या व्यथा कोणाला सांगू शकत नाही आणि आयुष्यभर मात्र चूपचाप सहन करत असते. अशा स्त्री व्यथांच्या कथांचा हा संग्रह आहे.
या पुस्तकातील पहिलीच कथा 'पिशवी' ही स्त्री एक सामान्य वस्तू आहे, अशी वागणूक मिळणाऱ्या असाहाय्य स्त्रीची हृदयस्पर्शी कथा आहे. या कथेवरून संपूर्ण पुस्तकातील सर्वच कथांचा अंदाज या पुस्तकाच्या वाचकांना येईल आणि असा अनुभव कुठेतरी आपल्याला ही आलेला आहे, याची अनुभूती होईल. स्त्रीला दैनंदिन जीवनात येणारे अनेक छोटे अनुभव आणि त्यातून तिची मानसिकता या कथांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीच्या बाबतीत पुरुषांच्या चांगुलपणाच्या ही काही कथा या कथासंग्रहात आहेत.
वाचकांना या कथा स्त्रीबद्दल वेगळीच दृष्टी देतील, अशी आशा मला वाटते. स्त्री आणि पुरुष दोघेही या कथा संग्रहातील कथा वाचतील आणि हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल.