Ganakchakrachudamani Bhaskar Marathi By Mohan Apte
Ganakchakrachudamani Bhaskar Marathi By Mohan Apte
Regular price
Rs. 59.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 59.00
Unit price
/
per
'भारतीय खगोलशास्त्राचा पाया आर्यभटाने रचला, आणि त्याचा कळसाध्याय भास्कराचार्यांनी लिहला. हा गणितशिरोमणि आठशे वर्षांपूर्वी निवर्तला, पण गणिताच्या इतिहासात तो अजरामर झाला. आजही त्यांची ‘लिलावती’ गणितज्ञांना मोहिनी घालते आणि भास्कराचार्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. कुशाग्र बुध्दिमत्ता, गणिती विद्वत्ता, पांडित्य आणि कवित्व, अशा गुणांचा सुरेख संगम, असे होते त्यांचे व्यक्तित्व. सह्यगिरीच्या कुशीत जन्माला आलेला हा गणिती, भारतीय संस्कृतीचे एक रत्न होते यात शंकाच नाही. सन २०१४ मध्ये भास्कराचार्य यांच्या जन्माला ९०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी म्हणून त्यांना ‘गणकचक्रचूडामणि भास्कर’ ही पुस्तकरूपी मानवंदना. '