Prem Dhande Likhit 5 Pustakancha Set (Shivnetra Bahirji Naik 1 te 4 + Shivratna Shiva Kashid) - ( प्रेम धांडे लिखित ५ पुस्तकांचा सेट )
Prem Dhande Likhit 5 Pustakancha Set (Shivnetra Bahirji Naik 1 te 4 + Shivratna Shiva Kashid) - ( प्रेम धांडे लिखित ५ पुस्तकांचा सेट )
Couldn't load pickup availability
बहिर्जी खंड १ ते ४ -
स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या कर्तृत्वाची गाथा -
सह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित "शिवनेत्र बहिर्जी" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते.
शिवरत्न शिवा काशीद-
त्या अंधाऱ्या रात्रीला, कोठेतरी मोडून पडलेल्या त्या पालखीला, आजही जिवंत असलेल्या त्या वाटेला, पन्हाळ्याच्या बुरूज-कड्यांना आणि एके काळी सिद्दी जौहरची छावणी ज्या ठिकाणी होती त्या भूमीला, बस, यांनाच तो वीर आज स्मरणात असेल. त्याचा पराक्रम आजही त्यांच्या आठवणीत असेल.
शिवाजीराजांवर धावून आलेला काळ त्याने आपल्या अंगावर झेलला. आपले बलिदान देऊन त्याने आपल्या स्वामीला पन्हाळ्यातून निसटण्यास मार्ग मोकळा करून दिला; पण त्याच्या धाडसाची आणि शूरत्वाची ही एवढीशी गोष्ट मुळीच नव्हती.
तो जन्मलाच होता शिवाजी राजा म्हणून मरण्यासाठी !
त्याचा चेहरा शिवाजीराजांच्या चेहऱ्याशी मेळ खात होता. राजांच्या आणि त्याच्या नावात साम्य होते. जणू राजांची सावलीच तो! त्याच्या पत्नीचा आणि महाराणी सईबाईसाहेबांचा मृत्यूदेखील एकाच महिन्यात झाला होता. म्हणजेच, वाट्याला आलेले दु:ख देखील सारखेच! राजांप्रमाणेच तो पराक्रमासाठी सदैव आसुसलेला असे. जसे शिवराय आपली मऱ्हाठभूमी अत्याचारी तुर्कांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत होते, तसेच तो पन्हाळा यवनी जाचातून मुक्त व्हावा, यासाठी कायम धडपडत होता.
दोघांमध्ये एवढे साम्य कसे? हा फक्त योगायोग होता, की विधात्याची अद्भुत किमया ?
या सर्व प्रश्नांचा मागोवा घेणारी आणि इतिहासात नेऊन शिवा काशीद या विराच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास उलगडणारी एकमेव कादंबरी!
Share
