Pravahasathi Pravahaviruddh By Vinod Shirsath (प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध)
Pravahasathi Pravahaviruddh By Vinod Shirsath (प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध)
Couldn't load pickup availability
२०१३ ते २०२३ या दहा वर्षांत मी साधना साप्ताहिकात चारशे संपादकीय लेख लिहिले, त्यातील सर्वोत्तम शंभर लेख या पुस्तकात घेतले आहेत. त्यामुळे, कोणते विषय आलेले नाहीत किंवा कोणत्या विषयांवर आणखी लिहायला हवे होते, अशा प्रकारच्या अपेक्षा या पुस्तकातील लेख वाचून व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. उर्वरित तीनशे लेखांमध्ये बरेच वेगवेगळे विषय येऊन गेलेले आहेत, जे आज-उद्याच्या वाचकांना वाचायला आवडतील आणि मुख्य म्हणजे त्या दशकात साधनाची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत काय भूमिका होती हे दाखवू शकतील.
अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टिकोन तयार होत असतो. मग दृष्टिकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा वा करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच, एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टिकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. 'सम्यक सकारात्मक' हा माझा प्राचीन दृष्टिकोन आहे, त्यातून आकाराला आलेल्या भूमिकेला 'प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध' असे म्हणता येईल.
Share
