Pratyaksham Tattvamasi By Ajinkya Kulkarni (||प्रत्यक्षं तत्त्वमसि||)
Pratyaksham Tattvamasi By Ajinkya Kulkarni (||प्रत्यक्षं तत्त्वमसि||)
Couldn't load pickup availability
२०१५ मध्ये जेव्हा आय.एस.आय.एस. या अतिरेकी संघटनेने मोसूल शहरातल्या सरकारी ग्रंथालयातील अनेक दुर्मिळ आणि ऐतिहासिक हस्तलिखितांचा लिलाव केला. तेव्हा जगभरातील सरकारी संस्था, गुप्तचर संस्था, संग्रहालये आणि खाजगी संग्राहक रोमांचित झाले. लिलाव झालेल्या हस्तलिखितांमध्ये १८व्या शतकातल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याच्या नोंदी होत्या. त्यात अब्जावधी डॉलर्स किमतीच्या ऐतिहासिक कलाकृतीचे आणि युद्धाची निर्णायक स्थिती बदलू शकणाऱ्या घातक शस्त्राचे वर्णन होते. तसेच जनुकीय अभियांत्रिकीच्या सूत्रांचे वर्णन करणारे सुद्धा एक हस्तलिखित होते. जगातील अनेक संस्थांना माहीत होते की ह्या हस्तलिखितातली कलाकृती अस्तित्वात आहे. त्या सर्व संस्थांना वेगवेगळ्या वेळी 'इम्रीस ओल्डमन' नावाच्या एका व्यक्तीने मदत केलेली असते. आणि तिथून सुरू होतो इम्रीस ओल्डमन या व्यक्तीचा शोध. हा इम्रीस ओल्डमन नक्की कोण ? पृथ्वीराज चौहान, समुद्रगुप्त, महाराजा रणजित सिंग यांच्यासारख्या महान राजांनी आणि बाबर, औरंगजेब, नादीर शाह, अहमद शाह अब्दाली यांच्यासारख्या आक्रमणकर्त्यांनी आणि अगदी ब्रिटिशांनीही पाठलाग केलेली ती ऐतिहासिक वस्तू कोणती ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणारी ही कथा म्हणजे 'प्रत्यक्षं तत्त्वमसि'.
Share
