Prashant Kulkarni - Chanakyaniti Chanakyasutransahit + Shrikrishnaniti Samajun Ghetana ! ( चाणक्यनीती चाणक्यसूत्रांसहित + श्रीकृष्णनीती समजून घेताना । लेखक - प्रशांत कुलकर्णी))
Prashant Kulkarni - Chanakyaniti Chanakyasutransahit + Shrikrishnaniti Samajun Ghetana ! ( चाणक्यनीती चाणक्यसूत्रांसहित + श्रीकृष्णनीती समजून घेताना । लेखक - प्रशांत कुलकर्णी))
Couldn't load pickup availability
1) चाणक्यनीती चाणक्यसूत्रांसहित - लेखक - प्रशांत कुलकर्णी - 199/-
पाने - १२०
विष्णुगुप्त चाणक्यसारखे अनोखे व्यक्तीमत्व सहस्त्र वर्षातून कधीतरी जन्माला येते. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले आर्य चाणक्य यांनी आपल्या विद्वतेच्या व नीतिच्या जोरावर प्राचीन काळात अखंड भारताचे स्वप्न उरी बाळगले. चंद्रगुप्त मौर्यसारख्या हरहुन्नरी राजपुत्राची निवड करुन या स्वप्नाला मूर्त रुप दिले. चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात प्रधान पदी विराजमान असतानाही गवताच्या साध्या झोपडीत ते राहत असे. राज्याच्या एखाद्या गूढ समस्येवर उपाय शोधण्यासाठी काळ्याकुट्ट अंधारात स्वतःला कोंडून घेत असत.जेव्हा झोपडीचा दरवाजा उघडत असे तेव्हा जणू काही काळ्याकुट्ट अंधारावर विजय मिळवणारा प्रकाशच बाहेर पडावा अशाप्रकारे समस्येवरील रामबाण उपाय शोधूनच ते बाहेर येत .
भारतवर्षात श्रीकृष्ण नीति,विदूर नीति नंतर प्रसिद्ध असलेली चाणक्य नीति आजच्या आधुनिक युगातसुद्धा मार्गदर्शक ठरते. चाणक्यनीतिचा सार हा राजा,सेनानायक , राजकारणी व उद्योजक या क्षेत्रांसाठी उपयोगाचे आहेच; पण त्याबरोबरच एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील तरुणांसाठीही तेवढेच उपयोगी ठरु शकते. विद्यार्थ्यांनी आपला आळस सोडून ज्ञानाचा ध्यास घ्यावा ! तरुणांनी व्यसन सोडून स्वतःला ओळखून जीवनाचे सोने करावे. आधुनिक जीवन जगताना क्षेत्र कोणतेही असो यशस्वी जीवनाचा दीपस्तंभ म्हणून चाणक्यनीति आजही दीपगृहासारखी मार्गदर्शक आहे.
2) श्रीकृष्णनीती समजून घेताना । लेखक - प्रशांत कुलकर्णी
पाने - १८४
श्रीकृष्णांची नीती ही एक प्रांत व एक देशापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे. श्रीकृष्णांची राजनीती व रणनीती हे तर मार्गदर्शक आहेतच पण त्यावरोवर आपल्या लाघवी स्वभावाने सर्वांना आपलेसे करणारे लोभस व्यक्तीमत्व बालकृष्ण, यौवनातील निर्मळ मैत्री असलेले राधारमण, गोपिकांबरोबर रासलीला खेळणारे कन्हैय्या, बासरी हे मधुर वाद्य वाजवणारे मुरलीधर, कंस, शिशुपाल, नरकासूरांसारख्या आसुरांचा वध करणारे रौद्र रुपातील श्रीकृष्ण, आबाल वृद्धांना मोहून टाकणारा मोहन, महाभारतयुद्धातील पार्थसारथी, जगाचे व मानव कल्याणाचा मंत्र अर्जुनाला देणारा योगेश्वर, संपूर्ण जगाचा पालनहार युगंधर अशी किती रुपे सांगावी ?
सदर पुस्तकात श्रीकृष्णांच्या जीवनातील ठळक गोष्टींचा अंतर्भाव करून त्यात त्यांच्या नीतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीकृष्ण जीवन जगत असताना त्यांचा प्रभाव समकालीन महापुरुषांवर तर होताच पण त्याचबरोबर ऐतिहासिक काळात अगदी प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळातही अनेक संत, तत्वज्ञान, राजे, महाराजे व नेत्यांवर त्यांचा प्रभाव पडलेला दिसतो.
श्रीकृष्णनीती आजच्या धकाधकीच्या जीवनात व येणाऱ्या अडी-अडचणीतून मार्ग काढण्यासाठी प्रत्येकासाठी दीपस्तंभाचे काम करु शकेल याबाबत शंकाच नाही.
Share
